पत्रकार:- मोहन जाधव @ गाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील रयत शिक्षण संस्थेचे मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन व वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे थोर देणगीदार प्रकाश तिडके यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जामदार व्ही.एन.भास्करराव चांदगुडे, सचिन चांदगुडे, महेश गाडे, अशोकराव माळी, शरदराव गरुड, संजय चव्हाणके, संतोष पह्रे, अस्लाम मन्सुरी,चांदगुडे सर, तुकाराम गाडे, पवनकुमार चांदगुडे, विनायक गाडे, प्रकाश शिंदे, नानासाहेब बनसोडे, राजेंद्र गावंड, सुनील जेजुरकर, प्राचार्य मांडवडे ए.आर. पर्यवेक्षक चंदने पी.आर. तसेच पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी 'शब्दगंध' या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या वार्षिक स्नेहसंमेलनात शाळेतील पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून देशभक्तीपर, आदिवासी नृत्य, अहिराणी नृत्य, प्रबोधन पर नाटक तसेच विविध मराठी, हिंदी चित्रपटातील गाण्यांवर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांनी या बाल कलाकारांना विविध स्वरूपात बक्षीसे दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतीक विभाग प्रमुख श्री. मोरे आर. के. व श्री. पारधे ए. एम.यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी *सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री मोरे आर. के. गावित एम.जे. राऊत एस.एल. पारधे ए.एम.* घोलप पी.बी. आडेप पी.व्ही. सारबंदे एन.एच. शेख आर.एन. मोमीन आय.ए.के. खोंडे आर.सी. शिळकंदे व्ही.ए. गोडे एस.एम. माळी एस.एल. चौधरी एच.एस. कु. सोनवणे मॅडम.पवार आर.बी. पेटारे ए.बी. काशिद एस.एस. सुपेकर जे.डी.डोखे एन.ए. गाडे ए. एम. कदम टी.ए. कांदळकर व्ही.ए. चांदगुडे टी.ए. बोरसे एन.डी. मोहन जाधव, मंडलिक एस.टी. पवार एस. एस. कापसे के.डी.यांनी परिश्रम घेतले.





Social Plugin