गंगापूर प्रतिनिधी भानुदास साळवे.
गंगापूर दि:-26/जाने/2025 आज 26 जानेवारी 2025 या रोजी ग्रुप ग्रामपंचायत मालुंजा खुर्द येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेमध्ये रमाई घरकुल योजना. गाय गोठा महात्मा गांधी रोजगार हमी योजना याअंतर्गत ग्रामसभेत विषयावर चर्चा करण्यात आली आणि या योजनांमध्ये लाभार्थ्यांचे नावे नोंद करण्यात घेण्यात आली तसेच सार्वजनिक गाव पातळी सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी चर्चा करण्यात आली यामध्ये सांडपाणी पिण्याचे पाणी रस्ता असे विविध कामाची नोंद घेण्यात आली आणि महत्त्वाचे मुद्दे लवकर सोडवण्यात येईल अशी आश्वासन घेऊन ग्रामसभा योग्य रीतीने पार पडली यास ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री रावते साहेब सरपंच साळुंखे साहेब उपसरपंच खैरे साहेब आणि सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते सर्वांच्या प्रश्नांचे योग्य निराकरण करून 26 जानेवारी 2025 या विशेष ग्रामसभा योग्यरित्या पार पडली या ग्रामसभेत गावातील महिला बचत गट आणि सर्व ग्रामस्थ हजर होते





Social Plugin