कृष्णा पवार@ग्रामीण प्रतिनिधी नाशिक
दिंडोरी - परनॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, चाईल्ड सव्हाईवल इंडिया व ग्रामपंचायत भनवड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हाडांची तपासणी शिबिर वार गुरूवार दिनांक 23/01/2025 या दिवशी आयोजित करण्यात आले होते .सदर शिबिरामध्ये 65 नागरिकांनी तपासणी करून घेतली.भनवड गावाचे सरपंच कचरू गायकवाड, ग्रा.प.शिपाई युवराज जाधव ,आशा सेविका ताई गांगोडे व मिरा बागुल यांचे विशेष सहकार्य लाभले .
यावेळी चाइल्ड सर्व्हायव्हल इंडिया (दिंडोरी) या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र अहिरे, मेडिकल ऑफिसर डॉ. सिद्धार्थ गांगुर्डे ,फार्मासिस्ट ऋषिकेश गावडे,आरोग्य शिक्षक महिमा सोनवणे ,डेटा एन्ट्री ऑपरेटर निशा पवार,आणि देविदास निकम व सनशाईन क्लिनिक नाशिक येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.गणेश आहेर आदी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.





Social Plugin