Ticker

6/recent/ticker-posts

उमरखेड तालक्यातील सोईट (म.) जि. प. शाळेत बाल आनंद मेळावा



बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी

उमरखेड तालुक्यातील सोईट (म) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 23 जानेवारी रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार वर्ग एक ते सातच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या घरून स्वादिष्ट व रुचकर पदार्थ बनवून आणले तसेच विविध फळे आणली, शाळेत आपल्या दुकानांचे स्टॉल लावून व घरून बनवून आणलेल्या विविध पदार्थांची व फळांची ग्राहकांना विक्री केली. यात विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेऊन मोठ्या उत्साहात आनंद मेळावा साजरा केला. सदर बाल आनंद मेळाव्यास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य तसेच गावकरी व पालक आवर्जून उपस्थित होते. मुख्याध्यापक गौरव शिंदे व पदवीधर शिक्षक शिवाजी पवार यांनी बाल आनंद मेळावा यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.