Ticker

6/recent/ticker-posts

मलकापूर मध्ये भव्य टेनिस बॉल तसेच आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा आयोजन



प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापूर

 मलकापूर :- मलकापुर येथे छत्रपती शिवाजी क्रिकेट क्लब, संग्राम क्रिकेट क्लब, आणि पोलीस मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य टेनिस बॉल तसेच आमदार चषक क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यश भैय्या संचेती यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले.

यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवर श्री.शिवराजजी जाधव, श्री.दुर्गेशजी प्रसाद, जाधव राजापुरे, श्री.अतुलसिंगजी राजपूत, श्री.ईश्वरभाऊ बोबडे, श्री.नितीनजी भुजबळ, श्री. अतुलजी जाधव, श्री.शुभमजी बोबडे, श्री.नानाभाऊ येशी, श्री.रविंद्रजी वानखेडे,  श्री.विकीजी जाधव उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या मंडळाचे कौतुक केले व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.