Ticker

6/recent/ticker-posts

संवेदना प्रकल्पाचे समन्वयक पांडुरंग नखाते यांना पुरस्कार प्रदान



कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी 

घनसावंगी: आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट अवॉर्डस २०२४ मध्ये देशातून महाराष्ट्र संवेदना प्रकल्पाला 'Epitome of resilience' हा एकमेव पुरस्कार संवेदना मानसिक आरोग्य प्रकल्पाचे घनसावंगी तालुका समन्वयक पांडुरंग नखाते यांच्या स्वरूपात मिळाला. शुक्रवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात बिर्ला ग्रुप चे सर्वेसर्वा कुमारमंगलं बिर्ला यांच्या पत्नी व Abet च्या सर्वेसर्वा श्रीमती नीरजा बिर्ला व अद्वैतिका बिर्ला यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण हॉटेल Grand ITC मुंबई येथे नुकतेच करण्यात आले. 

         दरवर्षी आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट abet अवॉर्डस दरवर्षी जाहीर करते. यामध्ये आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत देशभरात चालणाऱ्या प्रकल्पांमधून उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारांसाठी निवड केली जाते. देशभरातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या संवेदना प्रकल्पामधून महाराष्ट्र राज्यासाठी एकमेव पुरस्कार नखाते यांना जाहीर झाला. घनसावंगी तालुक्यात ते मागच्या अडीच वर्षांपासून संवेदना या मानसिक आरोग्य प्रकल्पात काम करत आहेत. यामध्ये मानसिक आरोग्याची जनजागृती करणे, शाळा-महाविद्यालय व गावात कार्यशाळा आयोजित करणे, तालुक्यातील पेशंट ला उपचारासाठी बोलावणे, निदान व उपचार आदी तसेच सर्वाधिक OPD च्या माध्यमातून आतापर्यंत तालुक्यातील ५०० अधिक लोक उपचार घेऊन बरे झाले आहेत. हीच उपलब्धी लक्षात घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या यशात एमपॉवर च्या अध्यक्षा श्रीमती परवीन शेख, संवेदना प्रकल्प प्रमुख हेमांगी मॅडम, राज्य समन्वयक दिलीप शिखरे, संध्या सरदार, अपूर्वा वालगुडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. एमपॉवर चे अधिकारी, संवेदनाचे सर्व तालुका समन्वयक, जिल्हा फेलो, ग्रामीण रुग्णालय घनसावंगी येथील अधिकारी व कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक व मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले आहे.