बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
डॉ. एन. डी. पाटील साहेब यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत असताना कष्टकरी, शेतकरी, मजूर यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढा उभा केला. असे प्रतिपादन रयत शिक्षण संख्येचे जनरल बॉडी सदस्य के.के.घाटगे यांनी केले.
पुसेगाव येथील, कला व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. एन. डी.पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी .भोसले, उपप्राचार्य डॉ.ए.एस.जगताप, प्रा.डॉ.संजय क्षीरसागर आजीव सभासद, रयत शिक्षण संस्था, सातारा. इ. उपस्थित होते. .
के के. घाटगे पुढे आपल्या भाषणात म्हणाले ,'डॉ.एन डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमन पदाच्या कालखंडात रयत शिक्षण संस्थेला दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. तसेच शेतकरी, कष्टकरी ,कामगार,शोषित यांच्या हक्कासाठी शोषणमुक्त व न्याय समाज बांधणीसाठी कार्य केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठविला. अनेक आंदोलने केली होती. अशा प्रकारे डॉ.एन.डी .पाटील साहेब यांचा जीवनपट सांगितला. तसेच विद्यार्थ्यांनी पदवीच्या शिक्षणाबरोबर रोजगार निर्मितीचे कौशल्य आत्मसात करून शिक्षण घेतले पाहिजे. आज बदलत्या तंत्रज्ञानाने विविध क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांना घेता येते. मोबाईलच्या तंत्रज्ञानाने क्रांती झाल्यामुळे समाजावर त्याचा चांगला वाईट परिणाम होत आहे या विषयीची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर .पी .भोसले म्हणाले, "डॉ.एन.डी.पाटील साहेब यांनी कामगार, शेतकरी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा दिला. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमन पदाच्या कालावधीतील शैक्षणिक ,राजकीय व सामाजिक कार्याविषयी माहिती सांगितली. सूत्रसंचालन प्रा. श्रीमती एम. बी. सोनार यांनी केले. तर आभार प्रा. डॉ.ए.एस.जगताप यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin