बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे]
शिक्षक दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण सेंटर मार्फत शिक्षकांसाठी भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .राज्यभरातून या स्पर्धेस भरभरून प्रतिसाद मिळाला . प्राप्त ८८० निबंधातून दोन विषयांपैकी प्रत्येक विषयाचे प्रत्येकी पाच निबंध बक्षीस पात्र ठरले .अशैक्षणिक कामे नसतील तर शिक्षक म्हणून आतापेक्षा मी काय अधिक चांगले करू शकेन?
या विषयावर जि. प. प्राथमिक शाळा गारवडी ( ता. खटाव ) शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका दिपाली प्रविण जाधव यांनी लिहिलेल्या निबंधाला राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला . नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शिक्षणपरिषदेत मा. खासदार सुप्रिया सुळे, वसंत काळपांडे व इतर मान्यवरांच्या हस्ते सौ. दिपाली जाधव यांचा सन्मान करण्यात आला. निबंधस्पर्धेत मिळवलेल्या या यशाबद्दल खटाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते , शिक्षणविस्तार अधिकारी संगिता गायकवाड , केंद्रप्रमुख नितीन खोत , गारवडी शाळेतील सहकारी शिक्षक तसेच ग्रामस्थ यांनी कौतुकाचा वर्षाव केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





Social Plugin