प्रतिनिधी दीपक गुरव@ चाळीसगाव
चाळीसगाव: कत्रड घाट परिसरात एका माकडाने धुमाकूळ घातलेला होता हा माकड जाणाऱ्या येणाऱ्या प्रवासांना चावा घेत घाटाच्या पायथ्यापासून तर जय मल्हार येथे जाणाऱ्या पर्यटकांना धरू की पळू करून सोडत होता या माकडाने आतापर्यंत अनेक जणांचा चावा घेतला आहे
विशेष म्हणजे महिलांच्या मागे जास्ती लागत असे. दोन महिन्यापूर्वी बोढरे येथील एका चिमुकलीच्या कानाला चावा घेत रक्तबंबाळ केल्याची घटना घडली होती वनविभागाला याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. आज दुपारी ४ वा सुमारास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू करून या पिसाळलेल्या माकडाला जेरबंद केले आहे. यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले.





Social Plugin