Ticker

6/recent/ticker-posts

पंचायत समिती व्हॉलीबॉल संघाची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी चौथ्यांदा निवड



मालेगाव  प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 


      मालेगाव : दि 11जाने 2025

जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न झाला. या महोत्सवात मालेगाव पंचायत समितीच्या व्हॉलीबॉल संघाने पुन्हा एकदा अजिंक्यपद पटकावले आहे. तसेच या संघाची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे या संघातील खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

           वाशिम जिल्हा परिषद मध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जिल्हा क्रीडा संकुलावर दि.८ जाने ते १० जाने दरम्यान संपन्न झाला. या महोत्सवात जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील ११३५ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.या स्पर्धेत मालेगावच्या व्हॉलीबॉल संघाने चौथ्यांदा अजिंक्यपद पटकावले आहे.२०२४ चा अपवाद वगळता मालेगाव संघाने सातत्याने या स्पर्धेत विजय मिळवलेला आहे. याही वेळेस मालेगाव संघाने चांगली कामगिरी करत अजिंक्यपदा वर नाव कोरले आहे. सलग ३ सामन्यात दर्जेदार कामगिरी करत मालेगाव संघाने जिल्हास्तरावरील अजिंक्यपद पटकावले आहे. या व्हॉलीबॉल संघातील कर्णधार प्रशांत देशमुख यांच्यासह गटशिक्षणाधिकारी गजानन परांडे, ललित सोलव, संजय सुरेकर,आत्मलिंग बिडवे,कैलास कदम,वासुदेव खुळे,दीपक ढोबळे,नितीन देवकर इत्यादी खेळाडूंनी उत्तम खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे हा विजय सुकर झाला. दि.१० रोजी झालेल्या बक्षीस वितरण समारंभात जिल्हा चॅम्पियन ठरलेल्या मालेगाव व्हॉलीबॉल संघास वाशिम जिल्हा परिषद चे सीईओ वैभव वाघमारे यांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मालेगाव व्हॉलीबॉल संघाने जिल्हास्तरावरील आपला दबदबा कायम ठेवल्यामुळे सर्वत्र त्यांच्यावर कौतुक होत आहे.