Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक बांधिलकी साठी सेवानिवृत्त अधिकारी दौऱ्यावर



सेवानिवृत्त वाशीमच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी गायकवाड यांचा पुढाकार.


मालेगांव प्रतिनिधी जावेद धनु भवानीवाले 


   वाशिमचे सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी यांनी एकत्र येऊन प्रशिक सेवा निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्थेचे पदाधिकारी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक व धम्माचे शैक्षणिक कार्यासाठी विदर्भ दौऱ्यावर येऊन गेले आहेत. त्याची निवृत्ती नंतरही सामाजिक बांधिलकी साठीची सेवानिवृत्त अधिकाऱ्याची धडपड दिसून आली.

    वाशिम जिल्ह्याचे सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी रंगनाथ गरुड सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी , पीडी निकुंभ, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी, जनार्दन शिरसाट सेवानिवृत्त तहसीलदार, प्रदीप ढोके,सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी .भाऊराव तायडे सेवानिवृत्त उपसचिव मंत्रालय, बंधू गायकवाड सेवानिवृत्त तहसीलदार व गौतम पुंडकर सेवानिवृत्त महसूल अधिकारी हे सर्व प्रशिक सेवा निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्थेचे पदाधिकारी यांनी सामाजिक धार्मिक व शैक्षणिक कार्यासाठी विदर्भ दौरा दिनांक 14 जानेवारी ते 18 जानेवारी पर्यंत सेवानिवृत्तानी विदर्भ विभागाचा दौरा केला.ह्या दौऱ्यात त्यांना विदर्भात जनतेने भरभरून प्रतिसाद मिळाला,तसे पाहिले यशवंत गायकवाड पूर्वी वाशिम येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी असताना सामाजिक व धम्मकार्यात कायम अग्रेसर असायचे त्यांच्या प्रयत्नातूनच वाशिम येथील नालंदा नगरचे त्रिरत्न बुध्दविहार भव्य दिव्य असे् बुध्दविहार निर्माण झाले आहे या ठिकाणी वर्षभर अनेक सामजिक धार्मिक कार्यक्रम चालू असतात.अशाप्रकारे यशवंत गायकवाड यांनी समाजाच्या उन्नतीकडे लक्ष पुरविलेले दिसून येते.ते सेवानिवृत झाल्यानंतर त्यांच्या सोबत विविध ठिकाणी पूर्वी सेवेत सोबत असलेल्या त्या स्नेही अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना परत सेवानिवृत्ती नंतर सोबत घेऊन प्रशिक सामाजिक संस्थेची त्यांनी निर्मिती केली आहे या संस्थेमध्ये शासकीय व निमशासकीय सेवेत असलेले निवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी, वकील, डॉक्टर एमएस ईबी चे अधिकारी कर्मचारी, आणि मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी या संस्थेत सेवानिवृत्तीनंतर ही कार्यरत आहेत प्रशीक संस्थेमार्फत समाजाच्या उन्नतीसाठी अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. विशेषतः शैक्षणिक कार्य मोठ्या प्रमाणावर व्हावे असा प्रशीक संस्थेचा संकल्प आहे.संस्थेने 2023-24 या वर्षात 12 जिल्ह्यात अल्प उत्पन्न गटातील एकूण 36 विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे ₹3,60000/- तीन लाख साठ हजार रुपये शैक्षणिक मदत वाटप केली.  

   विदर्भातील शेगाव येथून त्यांच्या या विदर्भ दौऱ्याची सुरूवात झाली.शैक्षणिक दृष्टीने समाजाच्या विकासासाठी साठी मिशन 27 चे उद्दिष्ट धरून दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल रेसिडेन्शिअल स्कूलची निर्मिती करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे हा संकल्प पुर्णत्वाकडे नेण्यासाठी सेवानिवृत्ती नंतरही सामाजिक कार्यात बांधून घेतलेले आयुष्यमान एमएसईबीचे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता उमेश शहारे व डॉक्टर मनोहर वानखडे यां दोघांनी त्यांच्या मालकीची शेगाव येथील एक एकर जागा प्रशिक संस्थेच्या शैक्षणिक कार्यासाठी विनामूल्य दान करण्याचा त्यांनी निर्णय घेतला , त्या जागेची पाहणी करण्यासाठी व ताब्यात घेण्यासाठी यशवंतराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच विदर्भाचा दौरा केला होता.यावेळी उमेश शहारे साहेब व जमिनीचे मालकी असलेले डॉक्टर मनोहर‌ वानखेड़े यांचे प्रतिनिधी मोका स्थळी जमिनीवर उपस्थित होते. अतिशय आनंददायी क्षण होता तो. यावेळी प्रशीक च्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला.या प्रसंगी शेगावचे प्रतिष्ठीत डॉक्टर मनोज तायडे हे स्वतः हजर राहून प्रशीक संस्थेच्या पदाधिकारी यांचे कौतुक केले होते आणि सर्वोतोपरी प्रशीक संस्थेला मदत करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. शैक्षणिक कार्यासाठी जमिन मिळणे ही मोठी उपलब्धी असल्याने आयु शहारे साहेब व डॉक्टर वानखेड़े साहेब यांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

    प्रशीक संस्थेने सामाजिक धार्मिक व शैक्षणिक कार्यात उंच भरारी घेण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा करण्याचा .संस्थेचे सदस्य संख्या वाढविण्याचा निर्धार केला आहे याचाच एक भाग म्हणून सुरुवातीला विदर्भाचा दौरा असल्याने शेगाव, बुलढाणा,वाशिम, मालेगाव , कारंजा व अकोला येथील बुद्ध विहारांना भेट देऊन सन्माननीय उपासकांशी भेटी घेऊन प्रशीक संस्थेला सहकार्य करण्याविषयी व‌ प्रशिक संस्थेने आवाहन केले. यशवंतराव गायकवाड यांच्या विनंतीला सहकार्य करण्याचे आश्वासन बुलढाणा, वाशिम, कारंजा, अकोट व‌ अकोला येथील बुध्दविहार समितीच्या प्रतिनिधीने प्रंशीक संस्थेच्या पदाधिकारी यांचे कौतुक करून प्रशिक संस्थेचे सदस्य होऊन संस्थेत सामील होण्याचे आश्वासन दिले.

   प्रशीक संस्थेचा विदर्भ दौरा यशस्वी करण्यासाठी शेगावचे डॉक्टर मनोहर वानखडे ,डॉक्टर मनोज तायडे ,उमेश शहारे, बुलढाणा येथील महाबोधी धम्मगिरी विहाराचे जेटी वाकोडे , सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश घेवंदे दिलीप कंकाळ विजय गजभिये ,ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट बुलढाणाचे कुणाल पैठणकर यांचे योगदान आहे. लुंबिनी बुध्दविहारात महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. वाशिम येथील नालंदा बुध्दविहारात रात्री दहा वाजेपर्यंत यशवंतराव गायकवाड याची वाट पहाणारे माणिक सोनोने, मिलिंद उके, दिलीप गवई, एड. मोहन गवई, डॉक्टर मुरलीधर ताजणे ,विलास भालेराव, एकनाथ धवसे,राजेंद्र अहिर आणि वाशिम च्या मंडळीं सह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या अरुणा ताजणे,शुभांगी अहिर,प्रगती उके, ‌कांबळे , यांच्यासह वाशिम येथील उपासकांची हजर होते. त्याचप्रमाणे कारंजा लाड येथे आनंद बुध्दविहारात प्रा. प्रकाश जवंजाळ ,पाटील,राजाभाऊ चव्हाण,आणि कारंजा येथील प्रशिक बँकेच्या राऊत यांनी प्रशीक संस्थेच्या पदाधिकारी यांचे अभिनंदन व स्वागत केले.‌अकोट येथे विश्वशांती बुध्दविहारात मोठ्या संख्येने जमलेल्या उपासकांनी यात विहार समितिचे अध्यक्ष सुरेश गवई, तायडे .रायबोले आणि उपस्थित असलेल्या उपासकांनी स्वागत केले आणि प्रशिक संस्थेला योग्य ते सहकार्य व संस्थेचे सदस्य होण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्या नंतर अकोला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानला भेट दिली

 तेथे प्रा. मुकुंद भारसागळे यांनी प्रतिष्ठानची निर्मिती व त्या प्रतिष्ठान मध्यें ज्या समाजोपयोगी सुविधा दिल्या आहेत त्याची माहिती घेतली अकोला येथील प्रतिष्ठान महाराष्ट्रात एकमेव असे स्थळ आहे‌ कि तिथे शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान न घेता कॉलेज, बँक, वृध्दाश्रम, अशा एक ना अनेक सुविधा असलेले ते स्थळ पाहून अनेकांच्या नजरेचे पारणे फिटते त्या प्रतिष्ठानची उर्जा घेऊनच प्रशिक संस्था उर्जितावस्थेत आणणेचा प्रयत्न करणेचा संकल्प करूनच विदर्भाचा निरोप घेतला. असे संस्था अध्यक्ष यशवंत गायकवाड यांनी सांगितले. या दौ-यात मलकापुरचे तहसिलदार राहूल तायडे साहेब सिंदखेडराजा उपविभागिय अधिकारी संजय खडसे साहेब, सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश घेवंदे साहेब, सेवानिवृत्त महिला व बाल विकास अधिकारी दिलिप कंकाळ साहेब, वाशिमचे मिलिंद उके साहेब, कारंजाचे प्रा प्रकाश जवंजाळ व प्रशीक संस्थेचे सदस्य ‌ गौतम पुंडकर साहेब यांनी प्रशीक त्या 7-8 सदस्यांची ,निवास,भोजन याची चोख व्यवस्था केलेली होती. विशेषता तहसिलदार तायडे साहेब व पुंडकर साहेब यांनी अकोला ते संपूर्ण विदर्भातील ठिकाणांना भेटी देण्यासाठीच्या प्रवासासाठी वाहन उपलब्ध करून प्रशिक संस्थेच्या दौऱ्यात मोलाचे सहकार्य केले. विदर्भातील सन्माननीय मान्यवरांच्या सहकार्याने विदर्भ दौरा यशस्वी झाल्याने प्रशीक संस्थेच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.