Ticker

6/recent/ticker-posts

ढवळे विद्यालयात आनंद मेळावा संपन्न



मालेगांव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

मालेगाव :- तालुक्यातील शिरपूर जैन कोंडबातात्या ढवळे विद्यालय व संत ओंकारगीर बाबा कनिष्ठ महाविद्यालयात दि २१रोजी आनंद मेळावा उत्साहात सम्पन्न झाला‌.

      यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल लावून आपल्या खाद्यान्न विक्री करीत आपल्या हक्काची खरी कमाई केली. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी देखील विविध पदार्थाचा आस्वाद घेतला.

    शालेय जीवन म्हटले की ,विविध खेळ, शैक्षणिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद मेळाव्याच्या माध्यमातून नाना प्रकारच्या खाद्यान्नाचा आस्वाद, तसेच इतर कार्यक्रम घेतले जातात. यातून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते, तर खेळ प्रकारातून विध्यार्थ्यांना नवी चेतना मिळून आपल्या रुचिनुसार पुढे जाण्यास मदत होते. तर पाककलेतील गुण आनंद मेळाव्याच्या माध्यमातून समोर येतात, यातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक विषयी ज्ञान प्राप्त होते. कोंडाबातात्या ढवळे विद्यालयात दि २१रोजी विद्यार्थ्यांनाचा भव्य आनंद मेळावा भरवण्यात आला होता. यात पाणी पुरी, आपे, फळ विक्री, भेळ, चणे, ढोकळे, इडली असे विविध खाद्य पदार्थ विद्यार्थ्यांनी, व विद्यार्थी वर्गानी उपलब्ध केले होते. याचा आस्वाद विद्यार्थ्यांनी घेतला तसेच शिक्षक, शिक्षिका यांनी देखील विद्यार्थ्यांकडून सदर खाद्य पदार्थ विकत घेत आनंद घेतला. यावेळी वर्ग 5 ते 12 चे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच स्काऊट च्या विद्यार्थ्यानी यामध्ये सहभाग घेतला होता. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य अनंत देशमुख, पर्यवेक्षक प्रा. शेंडे, गौर , सर्जेराव , मंगेश ढवळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षिका यांची उपस्थिती होती. या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यानी 50 इतके स्टॉल लावले होते. त्यांच्या खाद्य पदार्थांची विक्री देखील चांगली झाली. आपली मेहनत आपला पैसा ह्या नुसार विद्यार्थी करीत असलेल्या उपक्रमांस चांगले यश मिळाले.