पुसेगाव दि .[प्रतिनिधी ]
शालेय जीवनापासून शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी यांनी योग्य संस्कार , चारित्र्यसंपन्न , प्रामाणिकपणा , कर्तव्यदक्ष , शिस्त व आत्मविश्वास निर्माण झाल्यास सामाजिक जीवनात निश्चीत यशस्वी होतील असे मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव वैभव राजेघाटगे यांनी सांगितले .
श्री नागनाथ विद्यामंदिर बुध व माजी विद्यार्थी 1973 - 74 बॅच च्या वतीने मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते . मान्यवरांच्या हस्ते डॉ बापूजी साळुंखे , स्वामी विवेकानंद , व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली . यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी यानी संस्था प्रार्थना , ईशस्त व स्वागीत ,समुह गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली . 1973 - 1974 च्या बॅचचे माजी विद्यार्थी प्रा भानुदास कोरडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व उद्देश सांगितला . विद्यालयाचे माजी विद्यार्थी वैभवराजे घाटगे यांची सहसचिव मुख्यमंत्री कार्यालय , दिलीप जगदाळे IAS ,नवनाथ जगताप धर्मदाय आयुक्त , अभिषेक सुर्यवंशी आंतराष्ट्रीय फुटबॉल खेळडून म्हणून निवड , प्रविण कचरे राष्ट्रीय गोळा फेक सुवर्ण पदक विजेते , मयुर नलवडे सहाय्यक कार्यकारीअभियंता जलसंपदा विभाग , करण त्रिपूटे जलसंपदा विभाग व पत्रकार प्रकाश राजेघाटगे यांची खटाव तालुका पत्रकार संघाच्या कार्यध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता . विद्यार्थ्यांना प्रोत्साहान व प्रेरणा मिळावी ही भावना व्यक्त केली . विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे यांनी विद्यालयात राबवण्यात येत असलेले उपक्रम व विविध स्पर्धा परीक्षेतील निकालाबाबत माहिती दिली . तसेच माजी विद्यार्थी यांनी दिलेल्या भौतिक सुविधांची माहिती दिली .
माजी प्राचार्य के. एम . नलवडे यांनी मान्यवरांचा परिचयं व त्यांनी केलेल्या सामाजिक जीवनात कार्याबद्दलची माहिती दिली व त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली . मान्यवरांचा सत्कार माजी विद्यार्थी 1973 - 74 बॅच च्या वतीने व विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. यावेळी वैभव राजेघाटगे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की या विद्यालयाने आमच्यावर जे संस्कार दिले आहेत त्यामुळे आज आम्ही घडलो आहोत व इर्थपर्यंत पोहचलो आहोत . 45-50 वर्षा पूर्वी शालेय जीवनात किती अडचणी होत्या तरीही सर्व माजी विद्यार्थी मोठ्या यशापर्यंत पोहचले आहेत . विद्यार्थी सध्या मोबाईलमुळे दररोज 3 - 4 तास वेळ वाया घालवत आहेत . तोच वेळ त्यांनी आपल्या वाचनासाठी द्यावा . वाचाल तर वाचल असे मार्गदर्शन केले . परीक्षेत मार्क थोडे कमी पडले तरी हरकत नाही परंतु शाररिक तंदुरुस्ती प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे .
सामाजिक जीवनात यशस्वी होऊन ताठ मानेने जगता आले पाहिजे . वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे विद्यार्थी यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी मार्गदर्शन केले . तसेच 1973 - 1974 बॅचने व विद्यालयाने केलेल्या सत्काराबद्दल धन्यवाद मानले व या सत्काराने ऊर्जा निर्माण होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ .रामचंद्र फडतरे यांनी मान्यवरांचा आदर्श घेऊन विद्यार्थी यांनी वाटचाल सुरू ठेवावी यापेक्षाही उंच भरारी घ्यावी अशा शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा . दत्तात्रय काळोखे यांनी केले तर आभार मानसिंग नलवडे यांनी मानले . यावेळी बुधचे उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे , माजी प्राचार्च के . एम . नलवडे , प्रा. भानुदास कोरडे , माजी प्राचार्य रामचंद्र कोरडे , जीवन इंगळे गोसावी साहेब , चंद्रकांत चव्हाण , धनंजय सुर्यवंशी , सुनिल रणसिंग , जनार्दन खरात , बाळासाहेब घाटगे ,मधुकर जगदाळे , बबन गुरव , संजय घनवट , आनंदराव घाटगे , गोपाळ नलवडे , प्रभाकर कोरडे, दिलीप भोसले , बुध व बुध पंचक्रोषीमधील ग्रामस्थ उपस्थित होते . तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते ..





Social Plugin