बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]
तारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेतील वक्तृत्व व हस्ताक्षर स्पर्धेत जि.प.प्राथमिक शाळा वेटणे ता. खटाव यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शिक्षण विभागाच्या दृष्टीने अत्यंत सन्मानाची समजली जाणारी वक्तृत्व स्पर्धेत कु.संचिता दत्तात्रय नलवडे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. समर्पक शब्दांनी, समय सूचक हावभावांनी आणि भावपूर्ण अभिनयाने सजलेले संचिताचे भाषण निर्विवाद यशापर्यंत पोहोचले.
हस्ताक्षर स्पर्धेत कु.प्रांजल सुरज नलवडे हिने उत्कृष्ट हस्ताक्षर, शुद्धलेखन, विरामचिन्हांचा योग्य वापर, अक्षराची योग्य उंची या जोरावर तिने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला. दोघींच्या या यशाबद्दल विविध मान्यवरांनी दोघींचे अभिनंदन केले. तसेच पेढा भरवून त्यांचे गोड कौतुक केले.
यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार वेटणे सरपंच सुधाकर देवकर, उपसरपंच महेश नलवडे, सर्व ग्रा.पं.सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद नलवडे, उपाध्यक्ष पल्लवी फडतरे,सर्व सदस्य, संजय नलवडे यांनी केला. गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते, विस्ताराधिकारी संगीता गायकवाड, केंद्रप्रमुख चंद्रकांत सुतार, अजित निकाळजे, नितीन खोत, संजय दिडके यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक संग्राम जाधव व उपक्रमशील शिक्षिका शोभा माळवदकर यांचे अनमोल मार्गदर्शन केले.





Social Plugin