अंबड तालुका प्रतिनिधी मयुर वाव्हळ
घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथील सागर साखर कारखाना परिसरातील झाडीत एका अठरा वर्षीय युवकाचे प्रेत आढळले असून याप्रकरणी तीर्थपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीर्थपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेली एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार सागर साखर कारखाना परिसरातील झाडीमध्ये एका युवकचे प्रेत आढळून आले. गोवर्धन सोनबा सानप (वय 18 वर्षे), रा. खोकरमोहा ता. शिरुरकासार जि. बीड, यास त्याच्या नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तिर्थपुरी येथे मयत अवस्थेत दाखल केले. डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले.
या घटनेबाबत तिर्थपुरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. अश्विनी नाकाडे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, घटनास्थळी तीर्थपुरीचे असिस्टंट सब इन्स्पेक्टर खडेकर, पोलीस कॉन्स्टेबल देशमुख यांनी पंचनामा करून शव विच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
घटनेनंतर पोलिसांनी तपास केला असता सदरील युवकानी गळफास घेतला असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल देशमुख यांनी दिलीय. याप्रकरणी तिर्थपुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबत चा अधिक तपास पोलीस करत आहेत.





Social Plugin