Ticker

6/recent/ticker-posts

घनसावंगी ते मच्छिंद्रनाथ चिंचोली रस्त्यावर अपघात: दुचाकी थेट शेतात



अंबड तालुका प्रतिनिधी मयुर वाव्हाळ 

आज रविवारी सायंकाळी ५:३० ते ६ वाजेच्या दरम्यान घनसावंगी ते मच्छिंद्रनाथ चिंचोली रस्त्यावरील बोडखा फाट्याजवळ एक गंभीर अपघात झाला. कॉर्नर पार करताना दुचाकी थेट शेतात गेल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय जखमीला पांडुरंग आबासाहेब घोगरे आणि बाप्पा खाडे यांच्यासह स्थानिक मित्र मंडळाने तातडीने खडकवाडी येथील पिकपच्या मदतीने घनसावंगी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

 रस्त्याने बुरानपुर ता पाथरी जी परभणी येथील भीमराव चव्हाण हे आपली दुचाकी क्रमांक एम एच झिरो ०६ सीए ६७९२ या गाडीवरून प्रवास करत असताना बोडखा फाट्यावर त्यांची दुचाकी कॉर्नर पार करताना थेट शेतात जाऊन पडल

रस्त्यावरील तीव्र वळणामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. नवीन वाहन चालकांना हा कॉर्नर योग्य पद्धतीने लक्षात येत नसल्यामुळे अशा अपघातांचे प्रमाण वाढत आहे. यापूर्वीही या ठिकाणी अपघात झाले असून, कठडे तुटले आहेत, परंतु त्यांना अद्याप रेडीयम किंवा इतर सुरक्षा उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. स्थानिक नागरिकांच्या मते, या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

  रेडीयमची अभाव आणि कठड्यांची दुरुस्ती न झाल्यामुळे भविष्यातही अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.