Ticker

6/recent/ticker-posts

श्री संत गजानन महाराज विद्या मंदिरात सावित्रीबाई फुले जयंती



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

 मालेगाव ता 4 जाने 2024 - मालेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज विद्या मंदिरात सावित्रीबाई फुले यांची जयंती ता 3 रोजी साजरी करण्यात आलीकार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सोजी होते ,

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे शाळेच्या संचालिका सौ अश्विनी गाभणे ,सौ रोहिणी गाभणे व्यवस्थापक कपिल भालेराव शिक्षिका सौ स्वाती सुरडकर ,सौ नीता भालेराव , पायल कान्हेड शुभांगी गुडदे ,सुजित अवचार प्रिया चोपडे ,हिना माने ,विना वीर सोनाली बेलहारकरआदी उपस्थित होते.

    यावेळी मुख्याध्यापक सोजी म्हणाले की सावित्रीबाई फुले पहिल्या शिक्षिका ,पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. . यावेळी नीता भालेराव यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर स्वयं रचित कविता सादर केली यावेळी सौ अश्विनी गाभणे ,यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला 

       यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर नाटिका विद्यार्थी सोहम बळी , माऊली शिंदे , धनश्री अंभोरे यांनी सादर केली यावेळी सोहम बळी महात्मा फुले यांच्या वेशभूषेत तर माऊली शिंदे सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आणि धनश्री अंभोरे फातिमा शेख वेशभूषेत उपस्थित होते या नाटिकेला ध्वनी शिक्षिका नीता भालेराव यांनी दिला सावित्रीबाई फुले यांच्यावर गीत विद्यार्थिनी गौरी कोकाटे व जान्हवी गावंडे यांनी सादर केले यावेळी विद्यार्थीनी लावण्या काळे व विद्यार्थी अनुज मैंदकर यांनी विचार व्यक्त केले

    कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ, राधा काळे यानी परिश्रम घेतले सूत्रसंचालन नीता भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन प्रिया चोपडे यांनी केले.