पुसेगाव दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव, ता. खटाव येथे सुरू असलेल्या सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त आयोजित जनावरांच्या प्रदर्शनास देखण्या खिलार जातीच्या जनावरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्ररासह "कर्नाटकातून ३३१ जातिवंत जनावरांची नोंद झाली. येथील सातारा - पंढरपूर रोडवरील यात्रा स्थळावर झालेल्या प्रदर्शनाला खिलारप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. -
या प्रदर्शनात पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील परमेश्वर धर्मा गायकवाड यांच्या चार दाती बैलाला काजळी खिलार बैल गटात चॅम्पियन किताब देण्यात आला. कवटाळे (ता. पंढरपूर) येथील शामराव भिमराव नागटिळक यांच्या जुळीक गायीने काजळी खिलार गाय गटात चॅम्पियन किताब मिळविला. खटाव तालुक्यातील फडतरवाडी ( बुध ) येथील स्वप्नील उत्तम फडतरे यांच्या आदत बैलाला खिलार कोसा बैल गटात चॅम्पियन किताब देण्यात आला, तर शिंदी खुर्द (ता. माण) येथील विलास ज्ञानदेव जाधव यांच्या
चार दाती गायीने खिलार कोसा गाय गटात चॅम्पियन किताब मिळविला. चॅम्पियन जनावरांच्या मालकाला २५ हजार रुपये व श्री सेवागिरी चषक देण्यात येणार आहे .
काजळी बैल गट.
१ )एक वर्षाच्या आतील बैल-
रोहन खपले-रोपके ( पंढरपूर ) प्रथम क्रमांक , दिपक चव्हाण उपळावी बु ( माढा ) व समृद्धी गलांडे ( माण) विभागून द्वितीय क्रमांक ,विष्णू ठोंबरे महूद ( सांगोला ) व आयुष पाटील सांगाव (कागल ) विभागून तृतीय क्रमांक
2) एक वर्षावरील खोड-
> तुकाराम बंडगर - माहीम (सांगोला ) प्रथम क्रमांक , विठ्ठल कसबे पळशी ( पंढरपूर ) व नितीन शिंदे उपळवी बु. ( माढा ) विभागून द्वितीय क्रमांक, ज्ञानेश्वर गायकवाड परीटे ( माढा ) व ऋषीकेश मोहिते टणू ( इंदापूर ) विभागून तृतीय क्रमांक , विक्रम कसबे पळशी ( पंढरपूर ) व विठोबा जमदाडे चिलेवाडी ( पंढरपूर ) विभागून उत्तेजनार्थ
3) दोन दाती बैल
> विजय जाधव भूटूबरे ( पंढरपूर ) प्रथम क्रमांक ,रोहन बटाणे उपळे ( मोहोळ ) व विठ्ठल बंडगर माहीम ( सांगोला ) विभागून द्वितीय क्रमांक , छगन गंलाडे सुरुपखानवाडी (माण ) व महादेव म्हस्के गादेगाव ( पंढरपूर ) विभागून तृतीय क्रमांक ,चंद्रकांत खरात वजरे ( सांगोला ) व रामचंद्र जाधव - सिदेवाडी ( पंढरपूर )
४ )चार दाती बैल
गायकवाड आंबे ( पंढरपूर ) प्रथम क्रमांक , अक्षय गिरी सातारा व दत्तात्रय बंडगर माहीम ( सांगोला )विभागून द्वितीय क्रमांक , रणजीत खपाले रोपके बु .( पंढरपूर ) व सिध्देश्वर खपाले रोपके बु( पंढरपूर ) विभागून तृतीय , गणेश रोमन मोहोळ ( सांगोला ) उत्तजनार्थ
५ )सहा दाती बैल गट
श्रवण पाटील विखडे ( मोहोळ ) प्रथम क्रमांक ,नितीन हातरे- पंढरपूर व महेंद्र कदम गिरवी (फलटण) विभागून द्वितीय कमांक , किरण बंडगार माहीम ( सांगोला ) व तुकाराम जाधव फडतरवाडी ( बुध ) विभागून तृतीय क्रमांक , अनिल घाडगे भडीशेगाव ( पंढरपूर ) वधनाजी राजाराम नागने महूद बु (सोलापूर ) विभागून उत्तेजनार्थ
६ )जुळीक बैल गट
गणपत खपाले रोपके बु (पंढरपूर ) प्रथम क्रमांक , तुकाराम डूबल- आजमसोठ ( पंढरपूर ) द्वितीय क्रमांक ,सागर चौगुले - आप्पाचीवाडी (चिकोटी ) तृतीय क्रमांक , रणजीत जाधव सिध्देवाडी ( पंढरपूर ) उत्तेजनार्थ
काजळी गाय गट एक वर्षाखालील गाय गट. रोहीत वायदंडे मल्लीक पेठ ( मोहोळ ) प्रथम क्रमांक , नारायण मेटकरी कवटाळे ( पंढरपूर ) व विष्णू चव्हाण नेर ( खटाव ) विभागून द्वितीय क्रमांक ,मयुर कानडे नाशिक व राजु धोत्रे गादेगाव विभागून तृतीय क्रमांक , श्रेयांका जाधव खातगुण व पप्पू मंडले माळशिरस विभागून उत्तेजनार्थ २ ) एक वर्षावरील गाय गट. रणवीर व्यवहारे मुंढेवाडी ( मोहोळ ) प्रथम क्रमांक , सुहास ठोंबरेम महूद ब्रु ( सांगोला ) व राजबापू गायकवाड आंबे ( पंढरपूर ) विभागून द्वितीय क्रमांक , शंभू पवार दगडा अकोले ( माढा ) व फरीद शेख नवलेवाडी ( खटाव ) विभागून तृतीय क्रमांक , दत्तात्रय सरगर वजरे ( सांगोला ) व बाबूराव नागटिळक कवठाळे ( पंढरपूर ) विभागून उत्तेजनार्थ ३ ) दोन दाती गाय हणमंत सुखसे सांगोला ( सोलापूर ) प्रथम क्रमांक , ऋषीकेश कोळी गोदगाव (पंढरपूर ) व सुजल भोजकर कोल्हापूर विभागून द्वितीय क्रमांक , आण्णासो मुसळे भंडीशेगाव ( पंढरपूर ) व. विकास गोरे कटगुण ( खटाव ) विभागून तृतीय क्रमांक , मधूकर बागल गादेगाव ( पंढरपूर ) व श्रीमंत बागल भोसरे ( माढा ) विभागून उत्तेजनार्थ ४ ) चार दाती गाय गट लहू कांबळे वाखरी ( पंढरपूर ) प्रथम क्रमांक , महेंद्र पाटील आष्टी ( मोहोळ ) ऋषीकेश सोनवणे इंदापूर ( पुणे ) विभागून द्वितीय क्रमांक , दिपक अडसुळ ललगुण ( खटाव ) व अभिमान नागटिळक कवटाळे ( पंढरपूर ) विभागून तृतीय क्रमांक ,सोहम भोसले अनपटवाडी ( खटाव ) व सुरज .बेडके हुपरी ( हातकणंगले ) विभागून उत्तेजनार्थ ५ ) सहादाती गाय गट. बालाजी म्हस्के गादेगाव ( पंढरपूर ) प्रथम क्रमांक , प्रफूल्ल गायकवाड कडलस ( पंढरपूर ) व संकेत लावंड खातगुण ( खटाव ) विभागून द्वितीय क्रमांक , सुरज गुरव हुपरी ( हातकणंगले ) तृतीय क्रमांक , स्वरा भोसले खटाव व तानाजी पवार धावडदरे ( खटाव ) विभागून उत्तेजनार्थ ६ ) जुळीक गाय गट शामराव नागटिळक कवटाळे ( पंढरपूर ) प्रथम क्रमांक , कालिदास पाटील विखळे बु. ( मोहोळ ) व रघुनाथ पाटील सांगाव ( कागल ) विभागून द्वितीय क्रमांक , तानाजी नागने महूद बु . व विजय पवार महूद बु विभागून तृतीय क्रमांक , हणमंत घनवट राजापूर ( खटाव ) उत्तेजनार्थ.
कोसा बैल गट
१ )एक पूर्ण खालील खोंडडॉ. अमोल जगताप- सोहाणे मोहोळ (सोलापूर ) प्रथम क्रमांक , प्रफुल्ल सावंत लासुर्णे (कोरेगाव)व गोरखनाथ खाडे ढाकणी (माण) विभागूण द्वितीय कृमांक , सुमित जाधव पुसेगाव (खटाव) तृतीय क्रमांक , प्रणय मदने विसापूर ( खटाव ) उत्तजनार्थ
2) एक वर्षावरील बैल
स्वप्नील फडतरे फडतरवाडी ( बुध ) प्रथम क्रमांक , यशवंत कोळेकर - सांगोला (सोलापूर) व प्रा. राजेंद्र, जगदाळे - पिंगळी (माण),समर्थ पाटणकर - सदाशिवगड (कराड) विभागूण द्वितीय क्रमांक ,संजय गुजर- खातगुण ( खटाव ) व दत्तात्रय सरगर सांगोला (सोलापूर) विभागुण तृतीय कृमांक ,वसंत अवताडे इरवडी (मोहोळ ) व चंदन बाचल पुसेगाव (खटाव) विभागूण उत्तेजनार्थ
३ )दोन दाती बैल गट
अर्जुन महाराज साळेकर शिरवळ (पुणे) प्रथम क्रमांक , संजय कारंडे महूद ( सांगोला ) व तुकाराम जाधव फडतरवाडी ( बुध ) विभागून द्वितीय कृमांक , संस्कार कांबळे नंदेश्वर मंगळवेढा व उत्तम फडतरे फडतरवाडी ( बुध ) विभागून तृतीय कृमांक , श्रषीकेश जाधव मळवली ( माळशिरस ) व बाळकृष्ण कांबळे तुपेवाडी ( कडेगाव ) विभागून उत्तेजनार्थ
4) चार दाती बैल गट
सतिश हांडे - हुपरी (हातकणंगले) प्रथम क्रमांक , मोहन चोरमले - मंगेवाडी (सांगोला) व प्रविण कणसे - अंगापूर विभागुण द्वितीय कृमांक , सिकंदर मुलाणी मंगळवेढा ( सोलापूर ) व अनिल घाडगे भंडीशेगाव ( पंढरपूर ) विभागूण तृतीय क्रमांक, मधु मदने विसापूर (खटाव)उत्तेजनार्थ
5)सहा दाती बैल
तुकाराम जाधव - फडतरवाडी बुध (खटाव) प्रथम क्रमांक , गणेश पाटील - विखडे ( बु ) मोहोळ द्वितीय कृमांक , रावसाहेब लोखडे ढाकणी (माण) व शिवाजी भोसले पेनूर मोहोळ (सोलापूर) विभागूण तृतीय कृमांक ,समर मारकळ नेर (खटाव) उत्तेजनार्थ
6) जुळीक बैल गट
राजेंद्र देशमुख - ईश्वर वाठार (पंढरपूर ) प्रथम क्रमांक यशवंत कोळेकर - सांगोला (सोलापूर) व पोपट नाईकनवरे - परवर्धन कुरोली (पंढरपूर ) विभागूण द्वितीय .क्रमांक , गणेश सुतार विसापूर (खटाव) व दत्तात्रय जाधव - खातगुण (खटाव ) विभागूण तृतीय क्रमांक , जोलीराम गायकवाड कटगुण ( शिंदेवाडी ) उत्तेजनार्थ कोसा गाय गट.
१ ) एक वर्षा खालील गाय गट
तुकाराम वाघमारे कवठाळी (सांगोला) प्रथम क्रमांक , प्रशांत तनपुरे ढेकळेवाडी ( मोहोळ ) व केतन घाडगे लासुर्णे ( कोरेगाव ) विभागूण द्वितीय क्रमांक , अजित घाडगे कळंबी ( खटाव ) व राजलक्ष्मी कांबळे महूद बु .( सांगोला ) विभागूण तृतीय क्रमांक , सागर क्षिरसागर बोथे [ माण] उत्तेजनार्थ
२ ) एक वर्षावरील गाय.
ओजस्वी जाधव चिमणगाव (कोरेगाव) प्रथम क्रमांक , राजेंद् पाटील काळकेवाडी वाळवा ( सांगली ) व सोमनाथ नारनवर - माहीम (सांगोला) विभागूण द्वितीय कृमांक , नारायण काकडे तांदूळवाडी ( माळशिरस ) व शौर्य चौगुले हातकणंगले (कोल्हापूर) व असद शेख नवलेवाडी (खटाव) विभागूण तृतीय क्रमांक ,शंकर भंडगे हातीत सांगोला व शरद पवार - जाधववाडी माढा (सोलापूर) विभागूण उत्तेजनार्थ.
३ )दोन दाती गाय
प्रसाद जाधव - चिमनगाव (कोरेगाव) प्रथम क्रमांक ,आरोही शेळके - शेळकेवाडी (सातारा) व दिनकर जाधव ललगुण (खटाव). विभागुण द्वितीय क्रमांक , नवनाथ भोसले चिकमहुद सांगोला (सोलापूर) तृतीय क्रमांक ,शुभम खोत तारदळ - हातकणगले कोल्हापूर उत्तेजनार्थ
४ )चार दाती गाय गट
विलास जाधव शिंदी खुर्द (माण ) प्रथम क्रमांक ,प्रफुल्ल सावंत लासुर्णे (कोरेगाव ) व अरिहंत कागवाड - बेळगाव विभागूण द्वितीय क्रमांक कृष्णदेव हाके कोर्टी पंढरपूर (सोलापूर ) तृतीय कृमांक , . चंन्द्रशेखर लंवगारे राजापूर व सुकुमार शिरदवाडे - उपरी हातकणंगले उत्तेजनार्थ
5)सहा दाती गाय.
उमेश शिंदे - खंडोबाची वाडी (सांगली) प्रथम क्रमांक ,उत्कर्ष सुतार हुपरी हातकणंगले (कोल्हापूर ) द्वितीय क्रमांक ,रमेश कांबळे - महूद( बु) सांगोला (सोलापूर) तृतीय क्रमांक ,संतोष गोरे कटगुण खटाव) उत्तेजनार्थ
6 )जुळीक गाय
राहुल मोरे - तळदगे हातकणंगले (कोल्हापूर) प्रथम क्रमांक , दिलीप जाधव - पुसेगाव (खटाव) व शिवनाथ काटकर - काटकरवाडी विभागूण द्वितीय क्रमांक ,प्रसन्न दडस आंधळी ( माण) व अजित घाडगे कळबी (खटाव) विभागुण तृतीय क्रमांक , विनोद माने - हुपरी हातकणंगले (कोल्हापूर) व जोतीराम जाधव - पुसेगाव (खटाव)उत्तेजनार्थ.
खिलारच्या उपजातीनुसार खिलार काजळी बैल, खिलार काजळी गाय, खिलार कोसा बैल, खिलार कोसा गाय अशा विविध जातिवंत जनावरांचा प्रदर्शनात समावेश होता. प्रत्येक गटात जुळीक, सहा दाती, चार दाती, दोन दाती, आदत (वर्षावरील), आदत (वर्षाखालील) अशा वयोमानानुसार सहा उपगटांत निवड स्पर्धा झाली. प्रत्येक उपगटात निवड झालेल्या प्रथम चार विजेत्या जनावरांच्या मालकांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, ३ हजार, २ हजार रुपये अशी रोख बक्षिसे देण्यात येणार आहे .. जिल्हा व राज्याबाहेरून आलेल्या शेतकऱ्यांना ट्रस्टकडून मदत देण्यात येणार आहे .
कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जातिवंत खिलार जनावरे प्रदर्शनात सहभागी झाली होती. प्रदर्शन पाहण्यासाठी राज्यातील खिलारप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरीची सोय करण्यात आली होती . सकाळी, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब उर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव यांच्या उपस्थितीत निवडी सुरू झाल्या . यावेळी जिल्हयातील पशुसंवर्धन विभागातील डॉक्टर यांनी निवडीच्या प्रक्रियेत भाग घेतला . छायाचित्र =पुसेगाव येथील सेवागिरी यात्रेत चॅम्पियन ठरलेल्या विविध गटातील जातिवंत खिलार जनावरांसोबत देवस्थान ट्रस्ट चेअरमन डॉ . सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते. (छाया : प्रकाश राजेघाटगे )





Social Plugin