Ticker

6/recent/ticker-posts

वैजापूरात उद्या बुधवारी रक्तदान महायज्ञ



प्रतिनिधी - जयदीप लोखंडे 

देशात होणारे अपघात व मोठं, मोठ्या शस्त्रक्रिया या साठी रक्ताची गरज भासत आहे.याचे भान ठेवत जगदगुरू नरेन्द्राचार्य  महाराज संस्थान यांच्या वतीने बुधवार(ता,१५)रोजी येथील उप जिल्हा रुग्णालयात "रक्तदान महायज्ञ शिबीर"सकाळ सात वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.वैजापूर येथील नरेन्द्राचार्य महाराज संप्रदाय सेवकांनी हे शिबीर आयोजित केले आहे, हे संकलित रक्त शासनाच्या रक्तपेढ्यांना प्रदान करण्यात येणार असून ते गरजू रुग्ण पर्यंत पोहचविण्यात येणार आहे. या निमित्ताने प्राचार्य व्ही,पी,कॉलेज,प्राचार्य एमआयटी कॉलेज रोटेगाव,प्राचार्य जे,के,जाधव कॉलेज,प्राचार्य बी व डी फार्मसी कॉलेज आघुर,व आनंद नर्सिंग कॉलेज वैजापूर यांच्या प्रमुखांना या संप्रदायातील सेवेकरी यांनी सोमवार रोजी भेटून जास्तीत जास्त युवक रक्तदाते  यांना रक्तदान करण्यासाठी आवाहन

करण्याची विनंती केली आहे.वैजापूर शहर,व तालुक्यातील तरुण वर्गाने रक्तदान साठी पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन करण्यात येत आहे.(फोटो कॅप्शन-प्राचार्य व्ही,पी,कॉलेज, प्राचार्य एमआयटी, व प्राचार्य बी,फार्मसी व जाधव कॉलेज यांना  विनंती पत्र देताना वैजापूर संप्रदाय)