बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
भारतीय साहित्यिक मूल्ये जपण्यास हिंदी भाषेचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळेच संपूर्ण जगात १० जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. असे प्रतिपादन हिदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष ता.का. सूर्यवंशी यांनी केले. .. . पुसेगाव येथील, कला व वाणिज्य महाविद्यालयात हिंदी विभाग आयोजित व लीड कॉलेज अंतर्गत 'विश्व हिंदी दिवस' व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आणि राजमाता जिजाऊ जयंती निमित्त सप्ताह कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी. भोसले प्रा. डॉ.संजय क्षीरसागर आजीव सभासद, रयत शिक्षण संस्था सातारा. उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एस. जगताप, लीड कॉलेज समन्वयक प्रा.एल.के पवार, श्री. एस. व्ही. माने, प्रा .डॉ .के एम .निंबाळकर प्रा. ए.के. देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
श्री सूर्यवंशी आपल्या भाषणात पुढे म्हणाले, 'भारत देश हा विविध संस्कृती व बोलीभाषांचा देश आहे. हिंदी भाषेत विद्यार्थ्यांना अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.दूभाषी, अनुवादक, संवाददाता, कथा व पटकथा, लेखक अशी अनेक क्षेत्रे आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असल्याचे पाहावयास मिळते त्यामुळे देश विदेशात मोठ्या प्रमाणावर हिंदी भाषेचे सभासमेलने देखील आयोजित केली जात आहेत.त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील लोकांना हिंदी भाषेचे महत्त्व सांगणे आणि लोकांच्या बोलण्यावर, भाषणात हिंदी भाषेचा समावेश करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले म्हणाले, 'हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी आणि आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून विकसित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरित केले. साहित्यिक व महामानव यांच्या चरित्र वाड्. मयाचे विद्यार्थ्यांनी वाचन करावे याविषयी माहिती सांगितली. तसेच राजमाता जिजाऊ एक आदर्श व्यक्तिमत्व होते. जिजाऊ सारख्या महामातेने छत्रपती शिवाजी महाराज यांना संस्कार देऊन महान राजा बनविला साहित्यिक व महामानव यांच्या चरित्र वाड.मयाचे विद्यार्थ्यांनी वाचन करावे याविषयी माहिती सांगितली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.के.एम.निंबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.के.ए. देशमुख यांनी केले.आभार प्रा. के .जी.कुंभार यांनी मानले .कार्यक्रमासाठी प्राध्यपक, शिक्षकेत्तरसेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin