Ticker

6/recent/ticker-posts

माळरानावर फुलवलेल्या या परसबागेची चर्चा

 


बुध दि .[प्रकाश राजेघाटगे]

        दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारवडीच्या शाळेने जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवल्याने माळरानावर फुलवलेल्या या परसबागेची चर्चा जिल्हाभर होताना दिसत आहे.

            प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्फत घेतल्या गेलेल्या सन 2024- 25 या वर्षाच्या उत्कृष्ट शालेय परसबाग स्पर्धेत दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या खटावपासून तीस किलोमीटर अंतरावर अतिशय डोंगराळ भागात वसलेल्या छोट्या गारवडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेने संपूर्ण जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. या अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यातील प्रथम क्रमांक च्या परसबागे ची पाहणी जिल्हास्तरावरील विशेष पथकाद्वारे करण्यात आली. परसबागेचे व्यवस्थापन, सीड बँक, सिंचन पद्धती, सेंद्रिय खतांची निवड, स्थानिक भाजीपाला लागवड, घनकचरा व्यवस्थापन, मायक्रो ग्रीन भाजीपाला ,व्हर्टीकल गार्डन, इत्यादी विशेष उपक्रमांच्या आधारे हे मूल्यांकन करण्यात आले. मूल्यांकनासाठी आलेल्या पथकाने पाण्याची उपलब्धता व त्याचा नियोजनबद्ध वापर , तसेच शालेय पोषण आहारात परसबागेतील भाज्यांचा वापर यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री अरुण आवळे तसेच सहकारी शिक्षक पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ यांचे भरभरून कौतुक केले. 

                  परसबाग निर्मितीसाठी शाळेतील उपशिक्षक सुनील जगदाळे,अनिता जगताप, दिपाली जाधव, अजित फडतरे, जयश्री कदम ,शाळा व्यवस्थापन समिती , पालक तसेच ग्रामस्थ गारवडी यांचे विशेष सहकार्य लाभले. शाळेच्या यशाबद्दल खटाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती सोनाली विभूते , शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड , केंद्रप्रमुख श्री नितीन खोत, सरपंच ,उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत गारवडी यांनी अभिनंदन केले.