Ticker

6/recent/ticker-posts

कोळी गावच्या ग्रामपंचायत कोळीकरांना पाणीच नाही



                    पाणीपुरवठा सेवकाला मात्र वेतन दरमहा चालू

शिवप्रसाद कदम निवघा प्रतिनिधी 

        कोळी गाव आहे चार हजार लोकसंख्येची वस्ती असून या ठिकाणी सर्वच लोक गुन्हा गोविंदाने नांदत असतात. परंतु ग्रामपंचायत कुठल्याच सुविधा गावासाठी उपलब्ध नाहीत पाणीपुरवठ्यासाठी तर अनेकदा आंदोलने करूनही अद्याप कोळीकरांना पाणी मिळाले नाही.

      कोळी ग्रामपंचायत अकरा सदस्य असून सुद्धा यावर कुणीही आवाज उठवत नाही पाणीपुरवठ्यासाठी व ग्रामपंचायतच्यासाठी दोन असे सेवक आहेत परंतु ग्रामपंचायतीचा सेवक हा त्या ठिकाणी नियमित कार्यरत असतो आणि तो त्याचे कामे नेहमीच करतो. 

        परंतु कोळी गावातील पाणीपुरवठा सेवक हे पद कार्यरत आहे परंतु या गावांमध्ये ग्रामपंचायतीचे कुठलेही पाणी कोणालाही मिळत नाही हे सत्यता असून सुद्धा या ठिकाणी संगमत करून पाणीपुरवठा सेवक हा काम न करता शासनाचे पगार उचलतो कारण या ठिकाणी नळ योजना चालू नाही तर हा काय काम करतो हा ही प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे.  

      शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून हा आर्थिक संगणमताने पाणीपुरवठा सेवक हा वेतन उचलत असतो परंतु यावर अंकुश कुणाचाच नाही अशी ही दिसून येत आहे केल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी पाणीपुरवठा सेवकाचे देयक आदा झाले आहे . कोळी ग्रामपंचायत ची सध्या अशी परिस्थिती झाली आहे की आंधळं दळत आणि कुत्र पीट खातात आशी अवस्था झाली आहे. 

                                           *यावर कुणी अंकुश लावेल का*

सदरील बाबी अतिशय गंभीर आहे परंतु याकडे कोण लक्ष देणार असाही प्रश्न निर्माण होत आहे परंतु शासनाच्या डोळ्यात धुळ फेकत तेथील पाणीपुरवठा सेवक हा नेहमी देयक उचलतो परंतु यात ग्रामसेवक व सरपंच इतर सदस्याशी धरून हा व्यवहार चालतो की काय असेही बोलले जात आहे एवढी मोठी गंभीर बाब असताना सुद्धा या प्रश्नाकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. या प्रकरणाची बोलण्यासाठी कोळी येथील ग्राम विकास अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी त्यांचा ब्रह्मध्वनी उचलला नाही यावरून काय समजावं असाही प्रश्न उपस्थित होत आहे.