Ticker

6/recent/ticker-posts

वाशीम जिल्हा परिषद व 6 पंचायत समिती वर प्रशासक नेमण्याचा मार्ग मोकळा



 मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 


    मालेगाव : 16/01/2025 वाशीम जिल्हा परिषद व चारही पंचायत समिती वर प्रशासक नेमण्याचा मार्ग राज्य शासनाच्या आदेशानुसार मोकळा झाला आहे, कारण दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी कार्यकाळ संपणार आहे.

     ग्राम विकास विभाग बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१.दिनांक:- १५ जानेवारी, २०२५. आदेश क्रमांक झेडपीए-२०२५/प्र.क्र.०२/पंरा-१ ज्याअर्थी, सोबतच्या परिशिष्ट अ मधील नमूद ०६ जिल्हा परिषदा, (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त जिल्हा परिषदा असा करण्यात आला आहे) चा कार्यकाळ अनुक्रमे दिनांक १६ जानेवारी २०२५, दिनांक १७ जानेवारी २०२५ व दिनाक रोजी संपुष्टात येत आहे.

     यामुळे जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती आणि उक्त पंचायत समित्यांचे सभापती, उप सभापती आणि सरपंच समितीचे सभापतींची पदे एकाचवेळी रिक्त होत आहेत, राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२ व दिनांक १८ डिसेंबर २०२४ च्या पत्रात नमूद केले आहे की, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका विहित कालमर्यादेत घेणे शक्य नाही आणि राज्य शासनाला विनंती केली आहे की, संबंधित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती करावी अशी शिफारस केली आहे.

     निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणूक अद्याप जाहिर करण्यात आल्या नाहीत, त्याअर्थी, आता, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. ५) मधील कलम ९१व व ७५ब या कलमान्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबंधित उक्त जिल्हा परिषदांच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी व त्यांची सर्व कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि उक्त जिल्हा परिषदांतर्गत उक्त पंचायत समित्यांचे संबंधित गट विकास अधिकारी यांना संबंधित उक्त पंचायत समितीचे सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी व त्यांची सर्व कर्तव्ये पार पाडण्यासाठी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती तसेच पंचायत समितीचे सभापती, उपसभापती व सरपंच समितीचे सभापती यांची पदे निवडणूकीद्वारे भरले जातील तोपर्यंत प्राधिकृत करीत आहे. राज्य सरकारने काढलेल्या या निर्णयामुळे आता जिल्हा पंचायत राज व्यवस्थाला गुंडाळून ठेवून येथे अधिकारी यांचे राज येणार आहे. हे मात्र खरे.


  जिल्हा परिषद वाशिम पहिल्या बैठकीचा दिनांक १७/०१/२०२० वाशीम जिल्हा परिषद अस्तित्वात आली होती आणि तो जिल्हा परिषदेचा कार्यकाळ दिनांक ६/०१/२०२५ समाप्त होणार आहे.

तर वाशीम जिल्ह्यातील पंचायत समिती वाशिम, मालेगाव, रिसोड, कारंजा, मानोरा व मंगरूळपिर यांच्या पहिल्या बैठकीचा दिनांक १६/०१/२०२० होता त्यामुळे पंचायत समितीचा कार्यकाळ दिनांक १५/०१/२०२५ समाप्त होईल आणि त्यानंतर आता जिल्ह्यात प्रशासकीय कारभार सुरू होणार आहे.