मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित
राजकुमार चिंचोळकर वाडेगाव
येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद ( मराठी ) शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहाच्या वातावरणात पार पडले . दिनांक २२ते २४ जानेवारी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .२२आणि २३ला सांस्कृतिक कार्यक्रम २४ला आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा भाग्यश्री हिरळकर तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प .स .सदस्य अफसर खान, उपसरपंच राजेश्वर पळसकार ग्रामपंचायत सदस्य सचिन धनोकार . अर्चना मसने सुरेश कातखेडे मुख्याध्यापक समाधान सोर डॉ. सोहेल खान दिलीप आकोत संध्या शेगोकार, सुरेखा बावणे राजकुमार अवचार पत्रकार राजकुमार चिंचोळकर. चंदन जंजाळ. डॉ. शेख चांद. सोहेल खान पठाण. सह आदींची उपस्थिती लाभली होती प्रारंभी विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून दीपप्रज्वलित करण्यात आले तद्वतच उपस्थित मान्यवर शाळा व्यवस्थापन समिती चे पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ पार पडला आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस असे बहारदार कला अविष्काराचे सादरीकरण केले त्यावेळी विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मसने यांनी तर प्रिया देशमुख यांनी आभारप्रदर्शन केले.





Social Plugin