Ticker

6/recent/ticker-posts

जाणता राजा प्रतिष्ठानकडून आयोजित शिबीरात २५१ जणांचे रक्तदान



                  (आष्ट्यात बाळासाहेब ठाकरे ९९ व्या जयंती निमित्त अभिवादन)

संदिप गावडे @ शहर प्रतिनिधी

    येथील जाणता राजा प्रतिष्ठान व शिवसेना आष्टा शहर यांच्यावतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. तसेच यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात २५१ जणांनी रक्तदान केले. याचे आयोजन शिवसेना ठाकरे गटाचे वाळवा तालुका प्रमुख पोपट भानुसे यांनी केले होते. 

      यावेळी भाजपा किसान मोर्चाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, शिवसेनेचे गौरव नायकवडी, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, उपनगराध्यक्ष विजय मोरे, बाबासाहेब सिद्ध, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले, माजी नगरसेवक अर्जुन माने, सतीश माळी, के. ए. माने, राहुल थोटे, सुधीर पाटील, डॉ. विक्रम अनुसे, डॉ. जितेंद्र साळुंखे, चैतन्य ढोले, भगवान ढोले, अनिल गुरव, महादेव सिद्ध, रमेश मोरे, प्रकाश मोरे आदी प्रमुख उपस्थित होते. 

       यावेळी पृथ्वीराज पवार म्हणाले, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे पोपट भानुसे यांचे सारखे नेतृत्व या शहराला लाभले, असून त्यांच्याकडे बाळासाहेबांसारखा नेतृत्व गुण आहे. त्यांच्या एका हाकेला आजही हजारो तरुण एकत्र येतात. त्यामुळेच हे रक्तदान शिबीरात एवढे रक्तदाते निर्माण झालेत. 

     तसेच गौरव नायकवडी म्हणाले, पोपटभाऊ भानुसे यांच्या नेतृत्वाखाली जाणता राजा प्रतिष्ठानने शिवजयंतीच्या माध्यमातून आष्टा परिसरात आपली एक वेगळी ओळख कायम ठेवली आहे. कोरोना काळातील दोन वर्षे वगळता सलग तेरा वर्षे त्यांनी असे विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. 

     तर पोपट भानुसे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या ज्वलंत विचारावर आमचे कार्यकर्ते एकनिष्ठ आहेत. 

      सांगली येथील आदर्श ब्लड बँक यांनी या रक्तदान शिबिराचे रक्त संकलन केले. या कार्यक्रमाचे संयोजन अण्णा फुलारे, रवी गुरव, पवन मस्के, सागर ढोले, अमोल माने, सुशांत ढोले, विजय भानुसे, सचिन ढोले, अमित सिद्ध, बबलू ढोले ,सलीम मुल्ला, रोहित गुरव, जयदीप आवटी, विनोद गोरे, दादा गावडे, गुंडा बंडगर आदींनी केले.