Ticker

6/recent/ticker-posts

वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडक कारवाई बेकायदेशीर रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्याला केली अटक.



वाई प्रतिनिधि - राहुल देशमुख 

वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने वाई पोलीस ठाणेचे हद्दीमधील एकसर येथे आरोपी राजेश शंकर सणस याचेकडुन ०१ बेकायदेशीर विदेशी बनावटीचे रिव्हॉलवर व ०१ देशी बनावटीचे पिस्टल असे एकुण १,२०,०००/- रुपये किंमतीचे ०२ रिव्हॉल्व्हर हस्तगत करुन आरोपीस केले जेरबंद केले 

दिनांक १६/१/२०२५ रोजी वाई पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी परि.पोलीस उपअधिक्षक श्री श्याम पानेगांवकर यांना त्यांचे खास बातमीदारांमार्फत बातमी प्राप्त झाली त्या बातमीच्या आधारे वाई गुन्हेप्रकटीकरण शाखेने एकसर गावामधील बसस्थानक येथे सापळा लावला असता, त्याठिकाणी एक इसम हा संशयितरितीने फिरतांना दिसला त्याचा गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी, अंमलदार यांना संशय आल्याने, त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव राजेश शंकर सणस सध्या रा एकसर ता. वाई जि सातारा असे असल्याचे सांगितले त्याची तपासपथकातील अंमलदार अधिकारी यांनी अंगझडती घेतली असता त्याचे कमरेचे डावे बाजुस ०१ विदेशी बनावटीचे पिस्टल खोचलेले मिळाले ते ताब्यात घेऊन त्याची अधिक बारकाईने अंगझडती घेतली असता, त्याचे कमरेचे पाठीमागे मध्यभागी पॅन्टमध्ये ०१ देशी बनावटीचे पिस्टल खोचलेले दिसले.

 सदरची १,२०,०००/-रुपाये किंमतीची दोन्ही रि्हॉल्व्हर ताब्यात घेऊन त्यास पिस्टल बाळगण्याचा परवाना आहे काय याबाबत विचारणा केली असता, त्याने परवाना नसल्याचे सांगितल्याने त्यास पुढील तपासकामी अटक करण्यात आलेले आहे. सदर कारवाई ही वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी परि. पोलीस उपअधिक्षक श्री श्याम पानेगांवकर,तपासपथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, परि. पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे पोलिस हवालदार अजित जाधव,नितीन कदम, राम कोळी, हेमंत शिंदे प्रसाद दुदुस्कर,श्रावण राठोड, धिरज नेवसे,विशाल शिंदे यांनी केली आहे.मा.पोलीस अधिक्षक साो श्री समीर शेख व मा. अप्पर पोलीस अधिक्षक साो श्रीमती वैशाली कडुकर मॅडम यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अभिनंदन केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज हे करीत आहेत.