Ticker

6/recent/ticker-posts

माजी उपमुख्यमंत्री भुजबळ रविवारी शेगांवात



*ओ बी सी नी मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे प्रा गाभणे यांचे आवाहन*


मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 


मालेगाव ता  10 - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ हे ता 12 जानेवारी रोजी शेगाव येथे येत आहेत दुपारी सकाळी 11.00 वाजता ते उपस्थिताना  मार्गदर्शन करणार आहेत  त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पश्चिम विदर्भ विभागीय अध्यक्ष प्राअरविंद गाभणे यांनी केले आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री छगनराव भुजबळ हे शेगाव येथील सावता नगर येथे आयोजित माळी समाजाच्या राज्यस्तरीय परिचय महासंमेलनासाठी येत आहेत यावेळी ते उपस्थिताना संबोधित करणार आहेत या कार्यक्रमाला माजी आमदार ,प्रा तुकाराम बिडकर ,लक्ष्मणराव तायडे कृष्णराव इंगळे ,प्रा तुकाराम बिडकर  या महासमेलन आयोजन समिती चे अध्यक्ष डॉ शंकरराव क्षिरसागर कार्याध्यक्ष महादेव खंडारे आदी उपस्थित राहणार आहेत

या संमेलनात होणाऱ्या छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाचा लाभ समता परिषदेच्या पदाधिकारी, समता सैनिक ओ बी सी तसेच छगनराव भुजबळ यांच्यावर प्रेम करणारानी घ्यावा असे आवाहन प्रा गाभणे यांनी केले आहे