प्रतिनिधी @ निलेश राठोड विठ्ठलवाडी
आदरणीय राधेश्यामजी चांडक, संस्थापक अध्यक्ष बुलढाणा अर्बन को-आँप क्रेडिट सोसायटी बुलढाणा, सौ. कोमलताई झंवर, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी बुलढाणा, व डाँक्टर सुकेशजी झंवर, मुख्य व्यवस्थापकीय संचालक बुलढाणा अर्बन को-आँप क्रेडिट सोसायटी यांचे मार्गदर्शनात, सहकार विद्या मंदिर डोणगाव येथे दिनांक आठ व नऊ जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन 'स्नेहबंध' उत्साहात पार पडले.
शैक्षणिक प्रगती सोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी बुलढाणा द्वारा संचालित इंदिराबाई माधव सावजी सहकार विद्या मंदिर डोणगाव येथे दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये कला व क्रीडा गुण विकसित करण्यासाठी विविध प्रकारचे सांस्कृतिक व क्रीडा विषयक कार्यक्रम साजरे केले जातात.
दिनांक 8 जानेवारी रोजी लेझीम पथक व स्काऊट गाईडच्या पथसंचालनाने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सरस्वती पूजनानंतर प्रमुख पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. स्थानिक सल्लागार समितीचे सचिव आदरणीय जीवनसिंग दिनोरे सर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी स्थानिक सल्लागार समितीच्याअध्यक्षा रूपाताई रमेश सावजी, उपाध्यक्ष दिलीप काका कळसकर, सदस्य सुभाष माधव सावजी, विजय भाऊ काळे, हितेश सदावर्ते, पूर्वा ताई सदावर्ते, डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे साहेब, केंद्र प्रमुख रायमुलकर साहेब, शिरसाट साहेब बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे विभाग प्रमुख, बुलढाणा अर्बन डोणगावचे शाखाप्रमुख वाहेकर साहेब, मुख्याध्यापक श्री सुनील गाढे सर उपमुख्याध्यापक नखोत सर आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्याअध्यक्षीय भाषणात दिनोरे सरांनी यावेळी विद्यार्थ्यांना आणि उपस्थित पालकांना संबोधित केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्व पटवून दिले. प्रमुख अतिथी अमरनाथ नागरे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर व सोशल नेटवर्क साईटस् चा वापर करताना घ्यावयाची खबरदारी रहदारीचे नियम व त्यासंबंधीच्या कायदे तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी इंटरनेटचा वापर करताना काय खबरदारी घेतली पाहिजे याविषयी माहिती दिली, व पालकांना आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी काही सूचना केल्या. नंतर गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. नर्सरी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य संगीत नाटिका, ऐतिहासिक देखावे अशा विविधतेने नटलेल्या बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण केले. विद्यार्थी व आपल्या पाल्यांचे कौतुक करण्यासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन दिवसीय या 'स्नेहबंध' वार्षिक संमेलनाची सांगता दिनांक 9 जानेवारी रोजी झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पंडितकर सर यांनी केले, तर जुनघरे सर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार विद्या मंदिर डोणगाव चा सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.





Social Plugin