अंबड तालुका प्रतिनिधी मयूर वाव्हळ
अंबड मंठपिंपळगाव फाट्यावर एका दुचाकीस्वारास अडवून लुटण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार सोमवारी घडला होता. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिक युवकांसह नागरिकांनी लुटची प्रयत्न करणाऱ्यांना जाब विचारला. तेंव्हा त्यांनी स्थानिकांना शस्त्र दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयित गुन्हेगार असल्याचे लक्षात येताच स्थानिक तरुणांनी तिघांना पाठलाग करून पकडले. मंठपिंपळगाव (ता. अंबड) फाट्यावर हा प्रकार घडला. अंबड पोलीसांनी संशयितांना मंगळवारी (दि.२१) न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या विषयी सूत्रांनी सांगितले, की अंबडकडून जालन्याच्या दिशेने जाणारी एक चारचाकी गाडी मठपिंपळगाव (ता. अंबड) पाटीजवळ सोमवारी रात्रीच्या सुमारास बंद पडली होती. यात पाच तरुण प्रवास करत होते. सोमवारी सकाळी मठपिंपळगाव येथील गावकऱ्यांनी बंद गाडी सुरू करण्यासाठी मदतही केली. तेंव्हा सदर तरुण सराईत गुन्हेगार असतील अशी कल्पना कुणालाही आली नाही. परंतु सकाळी संशयित तरुणांनी दारु आणून पिली.
दारुच्या बाटल्या रोडवर फोडल्या.
• याबाबत पठाण यांनी मठपिंपळगाव फाट्यावर असलेल्या काहींना कल्पना दिली व युवकांनी पाठलाग केला दिली. नातेवाईकांना फोन वरून सांगितले. तेंव्हा फाट्यावर असलेल्या युवक व नागरिकांनी संशयित तरुणांकडे जाऊन जाब विचारला तेंव्हा त्यांनी शस्त्र दाखवून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला मात्र, नागरिकांचा मोठा जमाव पाहून त्यांनी पळ काढला. त्यामुळे ही गुन्हेगारांची टोळी असल्याची कल्पना आली. तेंव्हा काही युवकांनी त्यांचा पाठलाग केला. यातील तिघांना युवकांनी पकडले तर दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले.
पिस्तुल असल्याची माहिती
• याबाबत अंबड पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी कर्माऱ्यांसह घटनास्थळी पोहचून संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांकडून धारदार शस्त्र, मिरची पावडर, तलवार, खंजीर असे साहित्य जप्त केले. पळून गेलेल्या एकाजणाकडे पिस्तुल असल्याची माहिती पकडलेल्या संशयितांनी दिली. अधिक चौकशीत त्यांनी आपले नाव वैभव व्यंकट सांगुळे (वय २७ रा. अहमदपूर जि. लातूर), दीपक बालाजी वाघमारे (वय २१) आकाश संजय वाघमारे (वय २० दोघे रा. जयभवानीनगर, छत्रपती संभाजीनगर), असे सांगितले. त्यांच्याकडे असलेली चारचाकी गाडीही पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित तिघेही पोलीस रेकार्डवरील सराईत गुन्हेगार वैभव सांगुळे हा लातूरमधून तडीपार आहे. पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सी.आर. दुबे अधिक तपास करत आहेत.
.jpeg)




Social Plugin