Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी बुधच्या महेश कुंभार यांची निवड



 सातारा जिल्हा अजिंक्य वीर कुस्ती स्पर्धेचा मानकरी

बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने  अहिल्या नगर (वाडिया पार्क ) येथे दि 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी 2024 - 25  या स्पर्धेसाठी सातारा जिल्हा संघाची निवड चाचणी शौर्य आर्मी इंग्लिश स्कूल गोळेवाडी फलटण  या ठिकाणी पैलवान जयदीप गायकवाड आणि पैलवान निलेश लोखंडे यांच्या मार्गदर्शन खाली   18 जानेवारी ते 19 जानेवारी येथे पार पडली.

सातारा जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरी 74kg गादी विभागातून व  ह्या वर्षी कुस्तीगीर संघातर्फे अजिंक्यवीर कुस्ती स्पर्धा घेतल्या .त्यामध्ये सातारा जिल्हा अजिंक्यवीरचा मानकरी झाला पैलवान महेश वसंत कुंभार ( बुध ) यांची निवड झाली आहे हा महाराष्ट्र केसरी 74kg मॅट विभागातून सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

पै.सुजल कांबळे (सुपणे ) याच्या वरती फायनल कुस्ती मध्ये 10-0 फरकाने विजय मिळवला

महेश कुंभार यांनी या पूर्वी पटना येथे झालेल्या ज्युनियर नॅशनल स्पर्धेमध्ये कास्यपदक प्राप्त केले आहे.  मिनी ऑलम्पिक बालेवाडी कुस्ती स्पर्धेमध्ये रोप्य पदक प्राप्त केले                                                             खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे.कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे

महेश वसंत कुंभार हा बुध गावाचा पैलवान आहे वडील त्याचे माथाडी कामगार होते . घरची परिस्थिती खूप  हालाखीची होती त्यातून त्यांनी पैलवान घडवला महेशचे शिक्षण बी.ए.झाले आहे . महेश कुंभार यांनी कुस्तीची सुरूवात लहान पणी जय हनुमान तालीम संघ ललगुन या ठिकाणी सुरवात केली . शालेय कुस्ती स्पर्धामध्ये प्रावीण्य मिळवत गेला तसेच गावामध्ये  सराव कमी पडू लागल्याने त्याने पुणे येते सह्याद्री कुस्ती संकुलन पुणे येते विजय काका बराठे यांच्या मार्गदर्शनखाली  कुस्ती सराव करत आहेत.