बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी
उमरखेड दिनांक २६ जानेवारी २०२५
उमरखेड तालुक्यातील सोईट (म) येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड चे माजी संचालक मा. बळवंतरावजी नाईक यांचे हस्ते करून ध्वजारोहन करण्यात आले. गावातून ढोल ताशाचा गजर करत लेझीम च्या तालावर प्रभात फेरी काढण्यात आली, यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होऊन कलेचे प्रदर्शन करत गावकऱ्यांचे मन जिंकले. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भाषणे केली तसेच विविध देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.
सदर कार्यक्रमासाठी उमरखेड पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. पंजाबराव रणमले साहेब यांचीही उपस्थिती लाभली. बाल आनंद मेळाव्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी कु. श्रावणी प्रशांत नाईक व विदयाभूषण झुळझुळे यांनाही पारितोषिक देऊन सहा. गटविकास अधिकारी साहेब यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री. विश्वनाथ पंडागळे, उपाध्यक्ष बबन खेडकर, धनंजयराव नाईक (पो. पाटील), सौ. कल्पना विनोदराव नाईक(सरपंच), निर्गुण लिमकर, करण देवकते, दिपकराव नाईक, प्रभाकर पांडे, रामा वंजारे, दिगंबरराव नाईक, विलासराव नाईक, साहेबराव नाईक, दिलीपराव देवकते, बलदेव माघाडे, देविदास माघाडे, प्रशांत नाईक, मारोती बंडू भालेराव, विनोदराव नाईक इत्यादी व अनेक मान्यवर हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गौरव शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक शिवाजी पवार यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी आसमा पठाण यांनी सहकार्य केले.





Social Plugin