श्री हनुमानगिरी हायस्कूल मध्ये चक्क पन्नास वर्षांनी पडल्या वर्ग मित्रांच्या गाठी ...
पुसेगाव दि .[प्रतिनिधी ]
पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूलच्या 1973 /74 मधील इयत्ता दहावीच्या बॅचचा गेट-टुगेदर सोहळा शाळेत नुकताच आनंदी वातावरणात व उत्साहात संपन्न झाला . ज्या शाळा माऊलीच्या प्रांगणात आपण घडलो, ज्या मैदानावर आपण खेळलो, दंगामस्ती केली ते मैदान ,त्या वर्ग खोल्या पाहून वयाची 65 वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी आपलं वय ,दुःख, वेदना, प्रपंच ,सारं सारं काही विसरले व प्रत्येकानी आपल्या जुन्या आठवणी पुन्हा स्मरून ते विद्यार्थी अवस्थेत गेले व प्रत्येक जण हेच म्हणत होता.
" उजळूनही आल्या आठवणी, छोटे झाल्यासारखे वाटले,
धन्य ती शाळा माऊली ,
ज्या माऊलीने आम्हासारखे यशस्वी विद्यार्थी घडविले. " जगण्याची जिद्द देणारे आमचे गुरुजन ,या गुरुजनांच्याप्रति आपण कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी बरेच वर्ष प्रयत्न चालू होते .तो योग आज जुळून आला आणि वयाची पंचाहत्तरीमधील गुरुजनांना अगदी हर्ष उल्हास आणि मोठ्या उत्साहात वयाच्या ६५ मधील विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात व यथोचित सन्मानित केले .हे सारं काही स्वप्नवत वाटत होतं. अविश्वसणीय वाटत होतं .
हा सोहळा साऱ्यांनाच ऊर्जा देणारा ठरला .प्रत्येकाच्या चेहऱ्यावर धन्यतेचे छटा दिसत होती. यावेळी विद्यार्थी मनोगतात श्री रामचंद्र जाधव ,श्री लक्ष्मणराव जाधव, श्री विलास जाधव, श्री एस. आर .पाटील सर, रेश्मा जाधव,श्री कृष्णात गोरे इत्यादींनी आपले मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा दिला .
माजी प्राचार्य श्री मधुकर कोथमिरे , श्री वाघमोडे सर, जोशी मॅडम यांनी त्या काळातील विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन, त्याचप्रमाणे आलेले अनुभव कथन केले व सर्वांना आशीर्वाद दिले .
कार्यक्रमास आशालता जाधव, रंजना जाधव ,आशालता जाधव , शामला जगदाळे ,अलका क्षीरसागर, जमिला पवार , आशाताई तारळकर, उमा हिरेमठ ,हसन आतार ,लक्ष्मणराव जाधव, मधुकर बनकर ,अनिल चव्हाण, जालिंदर देवकर ,एस .आर. पाटील सर, विलास जाधव सर, प्राचार्य दत्तात्रय गोफने सर, रामचंद्र जाधव ,सूर्यकांत जाधव, मनोहर काटकर, शहाजी केंजळे , रमेश कोथमीरे ,अशोक म्हेत्रे ,दत्तात्रय ननावरे ,गणपत पवार, बाबुराव पाचगणे, चंद्रकांत पाचगणे उपस्थित होते श्री एस . आर .पाटील यांनी प्रास्ताविक केले.
श्री अशोक म्हेत्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. श्री विजय जाधव यांनी सर्वांचे आभार मानले . श्री मोहनराव गुरव यांनी सूत्र संचालन केले .
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. छायाचित्र _ पुसेगाव येथील श्री हनुमानगिरी हायस्कुलच्या १९७३_७४ बॅचचे शिक्षक व विद्यार्थी _विद्वार्थिनी छाया - प्रकाश राजेघाटगे बुध





Social Plugin