प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
आज दि 04 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद केंद्रिय मराठी प्राथमिक शाळा डोंगरखंडाळा येhbथे कब बुलबुल अंतर्गत खरी कमाई तसेच बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी अगदी खादय यात्राच भरवली.
जिल्हा परिषद केंद्रिय मराठी प्राथमिक शाळा डोंगर खंडाळा येथे नवनवीन उपक्रम राबविले जातात .या उपक्रमांचा भाग म्हणून कब आणि बुलबुल पथकाकडून या वर्षी खरी कमाई या उपक्रमांतर्गत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन शालेय परिसरात केले होते. या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. छगन भाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला गावचे सरपंच कु. प्रज्ञाताई कांबळे , शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सौ. कोमल ताई मांडवे व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. गणेश काकडे उपस्थित होते. शाळा व्यवस्थपन समितीचे इतर सदस्य , ग्रामपंचायत सदस्य , गावातील प्रतिष्ठीत नागरीक, पालक व शाळेतील माजी विद्यार्थी मोठ्य प्रमाणावर उपस्थित होते. सर्वांनी चिमुकल्या मुलांनी बनवून आणलेल्या खाद्यपदार्याचा मनमुराद आनंद लुटला . विशेष म्हणजे बाजार भावापेक्षा अगदी स्वस्त खाद्यपदार्थ मिळत असल्यामुळे सर्वांना भरपूर पदार्थ विकत घेता आला.
उपस्थितांनी सदरील उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. दरवर्षी अश्या उपक्रमाचे आयोजन करावे याविषयी मत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका कु. पुष्पा गळवे मॅडम यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. सौ छाया जाधव मॅडम यांनी बाल आनंद मेळावाचे महत्व समजावून सांगीतले. सौ वर्षा हिवाळे मॅडम यांनी खरी कमाईतून कसे विद्यार्थी भावी नागरीक घडतात ही बाब अधोरेखीत केली. श्री टेकाळे सर व श्री शैलेश कुरुडे सर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. सय्यद जमिल सर यांनी कार्यक्रमाचे संचलन व्यवस्थितपणे पार पाडले.
मुख्यध्यापकांची प्रतिक्रीया
बाल आनंद मेळाव्यामुळे मुलांना व्यवहार ज्ञान प्राप्त होते. पैश्यांचा हिशोब कसा ठेवावा याची माहिती होते. तसेच विद्यार्थ्यांना या आनंद मेळाव्यातून आनंद प्राप्त होतो. स्वच्छता आणि निटनेटकेपणा या मुल्यांची जोपासना या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये निर्माण होते.
विद्यार्थी प्रतिक्रिया
१) अनन्या संतोष राठोड
आज दि ०४ जानेवारी रोजी आमच्या शाळेत आनंद मेळव्याचे आयोजन करण्यात आले त्यामुळे आम्हाला एक वेगळाच आनंद मिळाला. वेगवेगळे पदार्थ बनवण्याची व विकण्याची मजा आली.
२) कु ऋतुजा अनिल राठोड
आज आमच्या शाळेत आयोजित खऱ्या कमाई अंतर्गत बाल मेळाव्यातून आम्हाला व्यवहार काय असतो व तो कसा केला जातो याचे ज्ञान मिळाले व खऱ्या कमाईचे महत्व कळले
३) गायत्री विष्णु इंगळे
आमच्या शाळेत बाल आनंद मेळव्यात आम्हाला चविष्ट पदार्थ तयार करून आणण्याचा एक वेगळा आनंद प्राप्त झाला. या मेळाव्यातून पैश्याचा व्यवहार कळण्यास महत झाली तसेच एका खादय दुकानदाराने दुकानात कशी स्वच्छता ठेवावी या विषयी माहिती मिळाली.





Social Plugin