Ticker

6/recent/ticker-posts

आष्टा येथे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन



संदिप गावडे @ प्रतिनिधी 


        लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त येथील बसस्थानक चौकात असलेल्या राजारामबापूंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मानही करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आष्टा शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

          यावेळी माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, दूधसंघ संचालक संग्राम फडतरे, कारखाना संचालक रघुनाथराव जाधव, बबन थोटे, माजी उपनगराध्यक्ष विशालभाऊ शिंदे, विजय नाना मोरे, बाबासो सिद्ध, संचालिका उज्वला पाटील, प्रभाकर जाधव, अनिल पाटील, सुनील माने, रामचंद्र सिद्ध , के. ए. माने, व्ही. डी. पाटील, विश्वराज शिंदे, गुंडा मस्के, धैर्यशील थोरात, समीर गायकवाड, कपिल कदम, कुणाल काळोखे, धनाजी ढोले, चेतन ढोले, मिलिंद औताडे, सोमाजी डोंबाळे, प्रकाश सिद्ध, संदीप माने, शशिकांत भानुसे, संदिप खोत, प्रविण वारे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. 

     यावेळी बोलताना शिवाजी चोरमुले म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील यांचेमुळे तालुक्यातील शेतकरी समृद्ध बनला. त्याचबरोबर आमदार जयंतराव पाटील यांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे. त्यामुळे त्यांचे ऋण येथील जनतेने विसरता कामा नये.

         पुढे बोलताना ते म्हणाले, आष्टा शहरातील आमचेच ठेकेदार आज कामे मिळवण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे लोटांगण घेत आहेत. भाजप निकृष्ट काम म्हणून हिणवणाऱ्या ठेकेदारांनाच आता कामे कशी काय देत आहेत? यातून त्यांना किती टक्केवारी मिळते? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. 

          त्याचबरोबर आपल्या पक्षातील जेष्ठ व श्रेष्ठ पदाधिकाऱ्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ द्यायला हवे. ज्येष्ठांनी आता मार्गदर्शनाची भूमिका घ्यायला हवी. अशा कानपिचक्यादेखील त्यांनी स्वकियांना यांना दिल्या.

         तसेच यावेळी पत्रकार उत्तम कदम, सुनील पाटील, सुरेंद्र शिराळकर, तानाजी टकले, गजानन शेळके, संदीप गावडे, सुजित शिंदे, दत्तराज हिप्परकर, सागर जगताप, श्रेयश शिराळकर, राहुल वाडकर, संदीप कुडचिकर, सुधीर हिरुगडे, कुमार देसावळे यांचा पत्रकार दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.

        यावेळी बाबासो सिद्ध, दिपक ढोले, भीमराव माने, आकाश कोरे, सत्यजित पाटील, गोटु थोटे, उदय मोरे, शैलेश वारे, संजय वारे, गोरख वारे, राहुल वारे, सचिन लोंढे, प्रेम लोखंडे, विश्राम वारे, सुरेश सावंत, राजू वारे, संदीप मोरे, सचिन वारे, निखिल वारे, प्रशांत वारे, नितीन वारे, सागर वारे, दादा सावरी, बिरू येडगे, लव मोरे, महेश मोहिते, अभिजित परीट, अभिजित तानगे, बंडा कोडोलकर, प्रकाश माने तसेच व अहिल्या ग्रुप वाघांची तालीम मधील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.