Ticker

6/recent/ticker-posts

आष्टा शहरात भावई शिल्पसृष्टी उभारण्यात यावी- शिवसम्राट फाउंडेशनची मागणी



संदीप गावडे@  प्रतिनिधी 

          आष्टा शहराच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी शहरात एकात्मतेचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक भावई उत्सवाची शिल्पसृष्टी उभारण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन शिवसम्राट फाउंडेशन यांच्यावतीने आष्टा नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी यांना देण्यात आले.

         यावेळी शिवसम्राट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश गायकवाड, श्रीराम ढोले ,बाहुबली हालुंडे , अमित थोटे , अभिजीत मगदूम , दिपक गायकवाड आदी उपस्थित होते.

     यावेळी महेश गायकवाड म्हणाले, आष्टा शहराचे ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी देवीच्या भावई उत्सवामुळे शहराला एक ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. या उत्सवात बारा बलुतेदार व सहा आलूतेदार अशा 18 पगड जातींना या मान आहे. त्यामुळे भावई यात्रा हे एकात्मतेचे प्रतीक आहे. आष्टा शहराची ओळख ही भावई उत्सवामुळे आहे. त्यामुळे आष्टा नगर परिषदेच्या वतीने आष्टा शहरात भावई शिल्पसृष्टी उभारण्यात यावी. ही शिल्पसृष्टी उभारल्यास आष्टा शहरातील येणाऱ्या पिढीला परंपरेचा इतिहास समजेल. तसेच महाराष्ट्र व देश पातळीवर आपल्या गावाचा नावलौकिकही वाढणार आहे. 

      महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथील भाविक लाखोंच्या संख्येने या उत्सवासाठी उपस्थित असतात. त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रासह देशातून लोक आष्टा शहराला भेट देतील. त्यामुळे आष्टा शहराच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. तरी आमच्या मागणीचा सकारात्मकपणे विचार करून लवकरात लवकर आष्टा शहरात भावई शिल्पसृष्टी उभारावी. अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.