Ticker

6/recent/ticker-posts

'चार-सहा-नऊ' चा प्रश्न निशिकांतदादांच्या माध्यमातून लवकरच सोडवणार : प्रवीण माने



 संदीप गावडे @जिल्हा प्रतिनिधी 

        आष्टा येथील साईनगर, गांधीनगर, दत्त वसाहत येथील सर्वे क्रमांक चार, सहा, नऊ चा प्रश्न सुटण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून लवकरात लवकर सोडवू, असे असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे वाळवा तालुकाध्यक्ष प्रवीणभाऊ माने यांनी केले.

       आष्टा येथील दत्त वसाहत मधील सांस्कृतिक भवनासमोर सर्वे क्रमांक चार, सहा, नऊ मधील नागरिकांची बैठक झाली. यावेळी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी ते बोलत होते. 

       यावेळी प्रविण माने म्हणाले, आष्टा शहरातील सर्वे क्रमांक चार, सहा, नऊचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. येथील नागरिकांनी अनेक वेळा प्रयत्न करूनही हा प्रश्न सुटलेला नाही. येथील जमिनीची खरेदी विक्री करता येत नाही, कर्जसाठी ही जमीन तारणही घेतली जात नाही. यासारख्या अनेक अडचणींना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. मागील काळातच हा प्रश्न सुटायला हवा होता. पण तो सोडवला गेला नाही.

         पण आता राज्यात महायुती सरकार आले आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नसून ते तत्काळ सुटणार आहेत. त्यासाठी निशिकांत भोसले पाटील यांच्या माध्यमातून चार सहा नऊचा प्रश्नाचा पाठपुरावा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी भेटून हा प्रश्न मार्गी लावू, त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू, असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.