Ticker

6/recent/ticker-posts

गारवडी शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा



बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 २६ जानेवारी २०२५ भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त  आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गावचे जावई व गारवडी गावचे शिक्षणप्रेमी श्री . भरत शेडगे यांचे मेहुणे श्री. सचिनजी पोतेकर यांचेकडून जिल्हा परिषद शाळेस पाच संगणक ,चार रिंगिंग चेअर दोन टेबल व वायफाय सुविधा असे एकंदरीत पाच लाख रुपये किमतीचे साहित्य प्रदान करण्यात आले. व गारवडी शाळा डिजीटल करण्याच्या दृष्टीने भरीव योगदान दिले.शाळेच्या वतीने श्री. सचिन पोतकर यांचा केंद्रप्रमुख नितीन खोत यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी गारवडी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत गारवडीच्या सरपंच वंदना कदम, उपसरपंच विकास शेडगे, ग्रामपंचायत सदस्य संजय शेडगे, कमल कदम व अनेक ग्रामस्थ  उपस्थित होते सरपंच वंदना कदम यांनी ग्रामपंचायतीच्या ध्वजाचे ध्वजारोहण केले.ध्वजारोहणानंतर एरोबिक्स ,शालेय कवायत,लेझीम झांज व सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. 

याप्रसंगी अनेक ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले जिल्हा परिषद शाळेच्या वतीने शाळेस मदत करणाऱ्या सर्व शिक्षण प्रेमींचे शाल श्रीफळ देऊन आभार व्यक्त करण्यात आले. तसेच शाळेने केलेल्या उठावदार कामगिरीबद्दल शाळेतील शिक्षकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासो पवार, उपाध्यक्ष जयश्री कदम ,शिक्षणप्रेमी भरत शेडगे व सर्व सदस्य उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्रीअरुण आवळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.