प्रतिनिधी- शौकत शेख
शेवगाव- शेवगाव तालुक्यातील जवळपास 10 ते 12 गावांना वरदान ठरणाऱ्या पैठण तालुक्यातील बुधवार, (१६) रोजी कालवा समितीने ठरवून दिलेल्या चालू हंगामातील दुसरे आवर्तन सुटले असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे जायकवाडी पैठण धरणाची निर्मिती होताना शेवगाव तालुक्यातील असंख्य गावांना विस्थापित व्हावे लागले असून तालुक्यातील शेकडो क्षेत्र जमिनीचे काळे बोर क्षेत्र धरणामध्ये गेले असन व शेवगाव तालुक्याच्या हकेच्या अंतरावर धरण असताना अंतरावर धरण असताना त्याचा शेवगाव तालुक्याला त्याचा पाहिजे असा फायदा होत नाही पैठण धरणातून निघालेल्या उजवा कालवा 132 किमीच्या अंतराने माजलगाव धरणात नेहून झिरो करण्यात आला आहे
तसेच एकूण ७४ वित्त रिक्तेद्वारे टेल पर्यंतचे जमिनीचे क्षेत्र ओलिताखाली येत असून सध्या अनेक ठिकाणी वितरिकाची मोठ्या प्रमाणात फूट तुट झाल्याने असंख्य शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही चालू हंगामात कालवा समितीच्या बैठकीमध्ये ठरलेल्या आवर्तन मध्ये ६ जानेवारी रोजी दुसरे आवर्तन सुटणार ही तारीख निश्चित असताना कालव्याचे ठिकठिकाणी दुरुस्तीचे मोठमोठे कामे सुरू असल्याने दहा दिवस उशिराने कालव्यात पाणी कुठले आहे या पाण्याचा शेवगाव तालुक्यातील खडके. मडके .खाम पिंपरी. हदगाव. मुंगी. सोन विहीर. गायकवाड जळगाव. बोधेगाव या गावांना मोठा फायदा होत असून सध्या अनेक शेतकऱ्यांनी गहू पिकाची मोठ्या प्रमाणात कालव्याच्या पाण्याच्या भरोसेवर पेरणी केली आहे





Social Plugin