मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा शिरपूर जैन शाखेचा वतीने राज राजमाता जिजाऊ युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कै. कोंडबा तात्या ढवळे विद्यालय व संत ओंकारगीर बाबा कनिष्ठ महाविद्यालयात ९ जानेवारी रोजी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात एकुण ३४० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.राजमाता जिजाऊ , युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद तसेच क्रांतीसुर्य महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटक प्रमुख शाळेचे प्राचार्य अनंत देशमुख होते. तर आरोग्य शिबिर मध्ये डॉ. सोनल इंगळे एम डी मेडिसीन,डॉ अक्षय किशोर लहाने बि डी एस व सुमिल कटारे यांच्या टीम कडून २२५ विद्यार्थिनी व १२५ विद्यार्थी असे एकूण ३४० शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी अकोला विभाग संयोजक सुमित बरांडे, नगर मंत्री गजानन देशमुख, नगर सहमंत्री शुभम भांदुर्गे, सहमंत्री प्रथमेश कापकर, सहमंत्री सार्थक गोरे,ओमकार इंगळे, ओमकार वाघ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.





Social Plugin