Ticker

6/recent/ticker-posts

दर्पणदिनी संतांनी केला पत्रकारांचा गौरव; दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन



शिवप्रसाद कदम प्रतिनिधी हदगांव - 

वर्तमानपत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने आज ६ जानेवारी रोजी श्रीकृष्ण मंदिर येथे महादेव मठ संस्थानचे सद्गुरु शिव चैतन्य शिवाचार्य महाराज. व श्रीकृष्ण मंदिराचे योगी बापू यांच्या हस्ते शहरातील सर्व पत्रकारांचा शाल श्रीफळ फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सर्वप्रथम दर्पणकारआचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन सगुरु शिव चैतन्य शिवाचार्य महाराज व योगी बापू ज्येष्ठ पत्रकार शाम लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले. 

त्याचबरोबर उपस्थित सर्व पत्रकारांना शाल श्रीफळ फुल गुच्छ देऊन गौरव करण्यात आला. अन्यायाच्या विरोधात निर्भीडपणे लिखाण करणाऱ्या पत्रकारांचा संताच्या हस्ते सत्कार करणे म्हणजे पत्रकारांचे भाग्यच समजतो अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार शाम लाहोटी यांनी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकार गजानन गिरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन पत्रकार अतुल राऊतराव यांनी केले. यावेळी. ज्येष्ठ पत्रकार पंडितराव पतंगे. सुनील व्यवहारे यादव सुकापुरे. वैजनाथ गुडूप. महेश बोरकर.शिव कदम.दीपक सूर्यवंशी .अशोक गव्हाणे . कृष्णा चौतमाल , सचिन मुगुटकर. धर्मराज गायकवाड, मारुती काकडे गजानन जिद्देवार, सदानंद सोनाळे. संजय संदीप तुपकरी.. व असख्य पत्रकार उपस्थित होते.