Ticker

6/recent/ticker-posts

निढळ गावचे हरिश्चंद्र रामचंद्र खुस्पे यांना सामाजिक कार्यातील सर्वोच्च भारत भूषण पुरस्कार (ग्लोबल लिडरशिप अॅवॉर्ड) देण्यात आला



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

सन्मान आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दूत संघटना व भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून निढळ चे (ता. खटाव) ऑल इंडिया अँटीकरप्शन पार्लमेंट कमिटी व्हाईस प्रेसिडेंट हरिश्चंद्र रामचंद्र खुस्पे यांना मुंबईत ग्लोबल लिडरशिप अॅवॉर्ड २०२४ ने सन्मानित करण्यात आले.

हरिश्चंद्र खुस्पे यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्यामुळे हा गौरव करण्यात आला. यावेळी दिंडोरी येथील परमपूज्य गुरुमाऊली यांचे आदरणीय गुरुपुत्र आबासाहेब मोरे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश सकुंडे, राष्ट्रिय अध्यक्ष अफसर कुरेशी, स्थानिक आमदार हरूण खान, ए.सी.पी. मुंबई सुरेखा कपिले, बॉलिवूड सिने अभिनेत्री श्रावणी गोस्वामी आदि उपस्थित होते.

हरिश्चंद्र खुस्पे यांचे  श्री स्वामी समर्थ सेवेकरी राजेश दादा पवार पश्चिम महाराष्ट्र ग्राम अभियान प्रतिनिधी  सर्व स्वामी सेवेकरी, श्री स्वामी समर्थ दिंडोरी येथील सर्व सेवेकरी  संचालक,  आदिंनी अभिनंदन केले.