Ticker

6/recent/ticker-posts

नारळवाडी ता, पाटण येथे बिबट्याच्या दोन महिन्याच्या पिंल्लाचे पुनमिॅलन रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी,



पाटण(दिनकर वाईकर) 

पाटण तालुक्यातील मौजे. नारळवाडी ता. पाटण येथील बाग नावाच्या शिवारात रविवार दुपारी तीनच्या सुमारास ऊसतोड कामगार ऊस तोडत असताना बिबट्याचे पिल्लू उसाच्या पाचटीत दिसून आले. 

अचानक बिबट्याचे पिल्लू दिसल्याने ऊसतोड कामगारांनी तेथून पळ काढला.  व यावेळी वन अधिकाऱ्यांनाही माहिती दिली. वन विभागाने तत्काळ परिसरात येऊन पिल्लू ताब्यात घेतले. तेथील परिस्थितीची माहिती घेऊन बिबट्या मादी त्याच परीसरात असल्याबत खात्री झाली व मादी बिबट्या आपले पिल्लू मागे राहील्या मुळे मादी चवताळू नये , म्हणून पिल्लू व मादी यांचे पुनर्मिलन करण्याचा निर्णय घेतला

यावेळी परिसरातील नागरिक यांना सावध करून परीसरात बंदोबस्त लावण्यात आले. कराड येथील वाईल्ड लाईफ रेस्कुअर्स टीम व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना पाचारण करण्यात आले.संध्याकाळी पुन्हा पिल्लू ज्या ठिकाणी सापडले त्याच ठिकाणी पुनर्मिलन साठी विशिष्ठ प्रकारे क्रेट मध्ये ठेवण्यात आले. व आजू बाजूला कॅमेरे लावण्यात आले.रात्री 12.15 वाजता मादी बिबट्या पुन्हा आपल्या पिल्लू साठी तेथे आली, तिने   क्रेट मधून आपले पिल्लू अलगद तोंडात धरून घेऊन गेली.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी पाटण राजेश नलवडे ,मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल ठोंबरे,वनरक्षक यादव,विशाल हरपळ,रोहीत लोहार,वाईल्ड लाईफ रेस्कुअर्सचे रोहित कुलकर्णी, अजय महाडीक, रोहित पवार, गणेश काळे, रोहन वेळापूरे,नारळवाडी चे सरपंच अजित चव्हाण ,पोलीस पाटील यांनी मोलाची मदत केली.

 : पिल्लू हे सुस्थितीत होते, ते साधारण 2 महिन्याचे होते.मादी पिल्लू होते.  वाईल्ड लाईफ रेस्कुअर्सचे रोहन भाटे , रोहित कुलकर्णी, अजय महाडीक, रोहित पवार, गणेश काळे, रोहन वेळापूरे, यांनी कराड पाटण तालुक्यात अनेक वन्यजीव रेस्कु ऑपरेशन व पुनर्मिलन वनविभागाच्या सहकार्याने घडवून आणले आहेत.त्यांनी मोलाची मदत केली आहे