Ticker

6/recent/ticker-posts

विश्राम गृह येथे पाटण तालुका पत्रकार संघाचे वतीने पत्रकार दिन साजरा



पाटण (दिनकर वाईकर) 

 पाटण तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिनांक 6जानेवारी रोजी पत्रकार दिन विश्राम गृह  पाटण येथे साजरा करण्यात आला यावेळी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तळागाळातील वंचित घटकांचे प्रश्न शासनापर्यंत पोचविण्याचे काम आपण करता आपल्या लेखणीत एवढी ताकद आहे किआर्थिक ,सामाजिक ,राजकीय ,सह परिवर्तन घडू शकते प्रशासन व पत्रकार हातात हात घालून काम करण्याची पद्धत तालुक्यातीलअतिशय चांगली आहे पाटणच्या प्रशासनातील काही जे प्रश्न आहेत ते वरिष्ठ शासन स्तरावर निदर्शनास आणून द्याल त्यास आमच्याकडून भविष्यातही सहकार्य राहील अशी ग्वाही   प्रांताधिकारी सोपान टोम्पे, यांनी दिली यावेळी पाटणचे तहसीलदार अनंत गुरव  पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते 

यावेळी तहसीलदार आनंद गुरव म्हणाले लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार यांच्याकडे   पाहिले जाते पत्रकारांच्या लेखणीत ताकद आहे पत्रकारांची व प्रशासनाची तालुक्यात पत्रकार व अधिकारी यांची वेगळी नाळ जुळलीले आहे प्रशासनात काम करताना काही अडचणी असतात त्या पत्रकार निदर्शनात आणून देतात समाजाला वाट दाखवण्याची काम पत्रकार करत असतात भविष्यातही  पाटण तालुका पत्रकार संघाकडून चांगले काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतो

पाटण तालुका पत्रकार संघाची 1983 मध्ये झालेली स्थापना त्यापूर्वीची तालुक्यातील खडतर पत्रकारिता आणि संघाची आजपर्यंतची यशस्वी वाटचाल याविषयी मार्गदर्शन ज्येष्ठ पत्रकार ए, व्हि, देशपांडे  यांनी केले व पत्रकार संघाच्या कार्याबद्दल अभिनंदन केले

यावेळी कार्यक्रमास पाटणचे प्रांथाधिकारी सोपान टोंम्पे पाटणचे तहसीलदार अनंत गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम बाबा पाटणकर उपनगराध्यक्ष सागर पोतदार,  नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंचायत समितीचे माजी सदस्य जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजकीय पदाधिकारी विविध संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी॰ आदी मान्यवर हितचिंतकांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या माजी मंत्री विक्रम सिंह पाटणकर पर गावी असल्याने त्यांनी दूरध्वनीवरून सर्व पत्रकार यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास  पाटण तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते