Ticker

6/recent/ticker-posts

"बेडर - बेरड जात महाराष्ट्रात उपेक्षित* " - सदाशिव नाईक



*महायुती सरकारने विशेष करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लक्ष देऊन प्रश्न सोडवा अशी आग्रहाच्या मागणी*


  बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]  

  हजारो वर्षापासूनच्या इतिहासात बेडर बेरड हा निर्भयपणे लढणारा जात म्हणून जगत आला प्रामाणिकपणा इमानदारी आणि लढाऊ वृत्ती ही जातीच्या नसानसात भिनली होती मात्र प्रस्थापित समाजाने या वृत्तीचा फायदा घेत बेडर बेरड जातीचा फक्त वापर केला शिवभक्त बेडर कन्नाप्पा,कै.डाॅ.भिमराव गस्ती यांच्या पर्यंतच्या प्रवासा पाहता बेडर बेरड राष्ट्रप्रेमी होता मात्र इंग्रजांच्या काळात बेडर बेरड जातीवर चोर लुटारू असा शिक्का मारला गेला आणि मुख्य प्रवाहापासून बेडर बेरड अनेक मैल दूर गेला देशाला प्रजासत्ताकाच्या 75 सुवर्ण महोत्सव वर्षात पदार्पण करत करत आहोत देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे सामाजिक आर्थिक संस्कृतीक प्रगतीच्या गप्पा मारल्या जात आहे मात्र आज देखील महाराष्ट्रात खेडोपाड्यात विखुरलेल्या अवस्थेत संख्येने अल्प असलेला बेडर बेरड जात अप्रगत जीवन जगत आहे बेडर बेरड जात राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक प्रगती झाली नाही असे दुर्दैवाने नमूद करावे लागते आणि महाराष्ट्रात उपेक्षित जीवन जगत आहे अशी खंत जनजाती बेडर बेरड समाज उत्थान समिती महाराष्ट्र अध्यक्ष सदाशिव नाईक यांनी व्यक्त केली .

महाराष्ट्रात बेडर बेरड जातीचा समावेश अनुसूचित जाती मध्ये करावा आणि आरक्षणाचा लाभ द्यावा ही मागणीगेले अनेक वर्ष पासून *बेडर बेरड जातीतील बांधव आणि जनजाती बेडर बेरड समाज उत्थान समिती महाराष्ट्र करत आहेत मात्र त्याकडे महाराष्ट्र शासन व राज्यकर्ते दुर्लक्ष केले आहे जात एक संघटितपणे या मागणीसाठी पुढे येत आहे* मात्र बेडर बेरड जातीकडे दुर्लक्षित राहिला आहे ही वास्तव स्थिती लक्षात घेऊन अनेक वर्षापासून काम करताना जातीसाठी ठोस स्वरूपाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी *जनजाती बेडर बेरड समाज उत्थान समिती, महाराष्ट्र* गेले अनेक वर्षापासून आरक्षण चळवळ व्यापक करत आहे

बेडर बेरड जातीच्या आरक्षणासाठी ठोसपणे लढा उभा करून ही चळवळ जातीच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मी गेले अनेक वर्षापासून काम करत असून त्यामध्ये बेडर बेरड जातीतील बांधव महिला युवक युतीकडून मोठा प्रतिसाद लाभत आहे बेडर बेरड जातीतील सर्वांनी एकजुटीने लढा उभारत आहे मात्र न्याय मिळू शकेल नाही मला खात्री विश्वास आहे आरक्षणाच्या प्रश्नावर आत्तापर्यंत बेडर बेरड जातीतील अनेक बांधवांनी एकजूट बांधून लढा दिलेला आहे त्यांचा आदर्श माझ्या समोर आहे मी एक व्यक्ती म्हणून या लढ्याचे मी नेतृत्व करत असताना समाजातून जे पाठबळ प्रतिसाद मला लाभत आहे ते आशादायी आहे त्यामुळे *बेडर बेरड* जातीच्या सर्वांगीण विकासाच्या विचार करत चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे

बेडर बेरड जातीच्या आरक्षण हा महत्त्वाचा प्रश्न आहेच मात्र त्याबरोबर जातीतील अज्ञान अंधश्रद्धा दूर करून जातीला शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा माझे प्रयत्न सुरू आहे सुशिक्षित झालेला युवक-युवतींना आरक्षण चळवळीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे जातीतील व्यसनाधीन दूर करण्याबरोबरच *बेडर बेरड* बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम सुरू करण्याचा माझा मानस आहे बेडर बेरड जातीचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करून तातडीने आरक्षणाचा लाभ घ्यावा यासाठी लोकशाही मार्गाने मी चळवळ उभी करत आहे या बरोबरच बेडर बेड जातीचे जमिनीचे प्रश्न बाबत मी आवाज उठवत आहे बेडर बेरड जातीने शिका संघटित व्होवू लागले आहेत व आपला विकास साधण्यासाठी एकजुटीने मला ताकद देत आहे जातीचे प्रश्न राज्य पातळीवर नेण्यासाठी आदिवासी बेडर बेरड समाज उत्थान समिती महाराष्ट्र मजबूत करत आहे महाराष्ट्र शासन आज पर्यंत दुर्लक्ष केले आहे अशी खंत सदाशिव नाईक यांनी व्यक्त केली

हा जात महाराष्ट्रात *कोल्हापूर* जिल्ह्यात चंदगड, आजरा, गडिंग्लज कागल या तालुक्यात *बेरड* म्हणून ओळखले जाते सांगली जिल्ह्यात मिरज, कवठेमहांकाळ, जत आटपाडी तालुक्यात *बेरड* म्हणून ओळखले जाते, सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, सोलापूर शहर, अक्कलकोट तालुक्यात *बेडर-बेरड* म्हणून ओळखले जाते उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा परंडा तुळजापूर तालुक्यात *बेडर - बेरड* म्हणून ओळखले जाते लातूर जिल्ह्यात निलंगा तालुका *बेडर-बेरड* म्हणून ओळखले जाते बीड जिल्ह्यात *बेडर-बेरड म्हणून ओळखले जाते* परभणी जिल्ह्यात *बेडर बेरड*  जळगाव, धुळे जिल्ह्यात *बेडर* म्हणून ओळखले जाते महाराष्ट्र राज्यात दोन प्रभागांमध्ये आम्हाला समावेश केलेला आहेत बेडर अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट आहेत आणि बेरड विमुक्त जाती अ मध्ये समावेश आहे मात्र बेरड बेडर हा जात महाराष्ट्रात एकच आहे आणि रोटी भेटी आमची गेले कित्येक पिढीपासून होत आलेल्या आहे आणि होत आहेत परंतु महाराष्ट्रात आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये आमची रोटी बेटी होत आहेत आणि कर्नाटक राज्यामध्ये बेडर हा जातीला अनुसूचित जमातीमध्ये समावेश आहेत परंतु महाराष्ट्रात दोन प्रभागात समावेश केलेला आहे महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र शासनाने बेडर हा शब्द संबोधित करून आम्हाला अनुसूचित जातीचा दाखला मिळावा , अशी मागणी केली .