Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थी यानी आई -वडील व गुरुजनांनी दिलेले संस्कार जोपासावेत - आण्णासाहेब शिंदे



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]  

श्री नागनाथ माध्य व उच्च माध्य विद्यामंदिर बुध मधील इ 10 वी व 12वी मधील शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमात आई-बाप समजून घेताना संस्कार जे आई वडील व गुरुजनांनी दिले आहेत ते जोपासले जावेत व चुकीचे पाऊल पडता कामा नये असे  प्रमूख वक्ते आण्णासाहेब शिंदे  यांनी आपले विचार मांडले .विद्यालयाचे माजी विद्यार्थी व प्रमूख पाहुणे अशोक जगताप साहेब उपमुख्य सतर्कता अधिकारी jnpt  मुंबई यांच्या प्रयत्नातून सी एस आर फंडातून आत्याधुनिक स्वच्छतागृहाचे बांधकामाचे उद्‌घाटन नेस वाडीया फांऊडेश जनरल मॅनेजर कुशाला शेट्टी , सरपंच सुजाता बोराटे , उपसरपंच अभयसिह राजेघाटगे, प्राचार्य अंकुश भांगरे , सरपंच प्रियांका फडतरे , सरपंच अलका जगताप व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .

 मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली  व उपस्थित मान्यवराचा प्राचार्य भांगरे सर व शिक्षकांनी स्वागत केले . प्राचार्य भांगरे सर यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यालयात राबवत असलेले उपक्रम व माजी विद्यार्थी यांनी दिलेल्या भौतिक सुविधा याबद्दल माहिती दिली .वरदा खवळे, अस्मिता फडतरे या विद्यार्थिनीनी विद्यालयात आलेले अनुभव व शाळेने केलेले प्रयत्न याबद्दल आपले मत मांडले . तसेच तन्वी पात्रेकर विद्यार्थीनीने व सहशिक्षक तानाजी पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या . तसेच अशोक जगताप साहेब यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून वैयक्तिक गुणवत्तेत वाढ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली . त्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे व शंभार टक्के निकाल ,स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन जगताप साहेब यांनी केले . व दहावी , बारावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुशाला शेट्टी  मॅडम यांनी देखील शुभेच्छा दिल्या  व ग्रामीण भागातील मुलीसांठी स्वच्छतागृह ची गरज लक्षात घेऊन त्यांना सर्व सोयीयुक्त पुर्ण करून दिले त्याबद्दल समाधान व्यक्त केले .

तसेच अभयराजे घाटगे यांनी देखील ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून आवश्यक ते सुविधा देण्यात येतील असे आश्वासन दिले . यावेळी इ 5 वी  ते 12 वी विद्यार्थी यांना बुध व बुध पंचकोषी मधील दात्यांनी ठेवलेल्या 45000 रु . रोख पारितोषीक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले निकालाचे वाचन सहशिक्षक भगवान सरवदे व विशाल नाळे यांनी केले .

तसेच दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घघाटन  सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप पोमण पुसेगाव , पत्रकार प्रकाश राजेघाटगे , माजी प्राचार्य के डी पवार सर व शाळा  व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण , राहुल खवळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला . यावेळी संदिप पोमण साहेब यांनी विना लायसन गाडी चालवणे  कायदयाने गुन्हा आहे , भरधाव वेगाने गाडी चालवून आपघात होतात यासाठी तरुणांनी गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवावे व पालकांनी सतर्कता बाळगावी असे आव्हान केले . यावेळी आदर्श विद्यार्थी श्रवण मनोज फडतरे व आदर्श विद्यार्थिनी कु वरदा सोमनाथ खवळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमासाठी माजी प्राचार्य शेखर घाटगे ,माजी प्राचार्य अरविंद खराटे  , महेंद्र जगताप  , आतुल फडतरे  , प्रकाश पतके , नितीन गाडे , जालिंदर चव्हाण , ज्ञानेश्वर जगताप  तसेच कैलासवासी संभाजीराव घाटगे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य  , बुध व बुध पंचकोषीतील दाते , देणगीदार , पालक , ग्रामस्थ व आजी - माजी विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा दत्तात्रय काळुखे यांनी केले व आभार श्री दडस सर यांनी मानले यावेळी प्रा काळुखे सर यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी , शिक्षक शिक्षीका  शिक्षकेत्तर कर्मचारी , माजी विद्यार्थी अभिषक फुलारे व पुसेगाव पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले .