Ticker

6/recent/ticker-posts

गणेश राऊत आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानीत



प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी   

 मेहकर : - आपल्या लेखणीच्या माध्यमातून तळागळातील जनसामान्य लोकांना  न्याय देणारे , विधायक पत्रकारिता करणारे गणेश राऊत यांना नुकताच नाशिक येथे पलुस्कर सभागृहात भव्य कार्यक्रमात राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .  

अखिल विश्वकर्मीय समाज संघ महाराष्ट्र राज्य आयोजित गौरव महाराष्ट्राचा सोहळा आनंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार २०२५ नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता . या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हृदय रोग तज्ञ डॉ . अनिरुद्ध धर्माधिकारी , डेपोटी जनरल मॅनेजर सेबी सचिन अशोक सोनवने , उद्योजक नारायण क्षिरसागर , गजेंद्र सोनवने, पराग अहिरे , ब्रेन सर्जन डॉ. सुमित हिरे , डॉ .महेश मिस्त्री   उच्च न्यायलयाच्या वकील एडवोकेट अलका मोरे पाटील , समाजसेवक नरेश पाटील , प्रदेश अध्यक्ष सचिन आढळकर , जिल्हाअध्यक्ष मंगेश क्षीरसागर , महानगरप्रमुख राहूल सूर्यवंशी , प्रदेश प्रवक्ता दिपक शिरसाट या मान्यवराच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . गणेश राऊत हे मागील पंधरा वर्षापासुन सकारात्मक पत्रकारिता करत असून त्यांनी अनेक वृत्तपत्रामध्ये  काम केले आहे.

विविध वृत्तपत्रातून त्यांचे लेखही प्रकाशित होतात . त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या आधी ग्रामगीता साहित्य पुरस्कार , राज्यस्तरी कला गौरव पुरस्कार , प्रबोधकार संत नामदेव पुरस्कार , समाजरत्न पुरस्कार , उत्कृष्ट वृत्तसंपादनाचा दै विश्वजगत चा पुरस्कार ,पनवेल येथील पत्रकार उत्कर्ष समिती व बुलढाणा सुतार समाज एकिकरण समिती , रचियता साहित्य संघ नागपुर, साहित्य जगत मासिक यांनी सन्मानित करण्यात आले आहे . त्यांना मिळालेल्या या पुरस्कारबद्दल त्यांचे सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.