गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
बालकामगारांना कामावर ठेवणे दुकानदारांना चांगलेच भोवले आहे. गुरुवारी (दि. 23) कामगार अधिकाऱ्यांनी येथील येथील 3 आस्थापांनावर धडक कारवाई केली. या ठिकाणी काम करणाऱ्या 7 बालकामगारांची कामातून मुक्तता केली आहे. या कारवाईमुळे दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
कामगार उपआयुक्त नितीन पाटणकर यांचे निर्देश आणि वाशिमचे कामगार अधिकारी राहुल काळे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे. बाल व किशोरवयीन कामगारमुक्ती अभियान राबविण्यात येते. त्याअंतर्गत गुरुवारी शहरातील विविध दुकानांची झाडाझडती घेण्यात आली. यादरम्यान शहरातील तीन
आस्थपनेत एकूण 7 किशोरवयीन बालकामगार काम करताना अधिकाऱ्यांना आढळून आली. त्यांची कामातून मुक्तता करण्यात आली असून संबंधित आस्थापनेचे मालक मालक छोगालाल डांगी (टिळक चौक), शंभूलाल डांगी (मंगरूळ रोड) व किशोर राठोड यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कारवाईत दुकाने निरीक्षक, वाशिम (प्र) योगेश गोटे यांच्या नेतृत्वात दुकाने निरीक्षक अविकांत चौधरी, संजय पांडे (अमरावती), तुषार देशपांडे (मोर्शी) तसेच जिल्हा परिषदचे बबन सुर्वे व विष्णू कवर चाइल्डलाइन जिल्हा महिला व बालविकास प्रतिनिधी सहभागी झाले होते.





Social Plugin