तालुका प्रतिनिधी: शंकर निंबारे
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वाचन संकल्प पंधरवाडा राबविण्यात येत असून यानिमित्ताने नुकतेच ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
वाचन संकल्प पंधरवडा निमित्त महाविद्यालयात ' ग्रंथ प्रदर्शन, लेखक आपल्या भेटीला, काव्य वाचन ,कथाकथन, निबंध लेखन, सामूहिक वाचन, एक दिवस ग्रंथालया करिता,' आदि वेगवेगळे उपक्रम राबवून हा पंधरवाडा साजरा केला जाणार असून या उपक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभगातर्फे करण्यात आले असून या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रंथपाल प्रा. श्रीकृष्ण जाधव प्रयत्नशील आहेत. असे प्राचार्य डॉ.मोतीराम देशमुख यांनी सांगितले तसेच ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ देशमुख यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून दिले. यावेळी उपप्राचार्य डॉ.भारद्वाज, डॉ संदीप वाघ, प्रा. कुणाल वाघ, प्रा.राजेंद्र जगताप ,राकेश पगारे, प्रा.झझोटट यांसह सर्व स्टाफ तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.





Social Plugin