गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी.
धर्मनेता किसनभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनात चालणारी देशातील अग्रगणी संघटना राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. विलासभाऊ राठोडयांच्या अध्यक्षतेखाली, ज्येष्ठ समाजसेवक हिरासिंगभाऊ राठोड, माजी समाज कल्याण सभापती जयकिसनभाऊ राठोड, मा. प्राचार्य वसंत राठोड,यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारंजा बाजार समितीचे संचालक बालचंदभाऊ जाधव, माजी पोलीस अधिकारी विष्णू आडे साहेब, माजी पोलीस अधिकारी मोहन राठोड साहेब, प्रदेश उपाध्यक्ष श्याम राठोड, राज्य संघटक नारायण चव्हाण, विभागीय कार्याध्यक्ष सुनील राठोड अमरावती विभागीय संघटक डॉ. गुणवंत राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश पवार, जिल्हा उपाध्यक्ष रामराव राठोड, जिल्हा समन्वयक अनुभव चव्हाण, जिल्हा संघटक किसन आडे, जिल्हा प्रवक्ता रवींद्र चव्हाण, रामराव पवार, तालुका अध्यक्ष प्रवीण जाधव, तालुका उपाध्यक्ष सुशील राठोड, तालुका कार्याध्यक्ष गोपाल आडे, तालुका युवा अध्यक्ष वैभव चव्हाण, कार्याध्यक्ष पवन जाधव, शहराध्यक्ष पवन राठोड, स्वप्निल राठोड, तालुका संघटक दिनेश राठोड, विशाल राठोड, तालुका सचिव राजू राठोड, गजानन जाधव, वसंता चव्हाण सह अनेक पदाधिकारी या विचार सभेला उपस्थित होते.गुरुवार दि.२ जानेवारी, २०२५ ला कारंजा येथे राष्ट्रीय बंजारा परिषद, वाशिम जिल्हा कार्यकारिणीने आयोजित केलेल्या सहविचार सभेत, माजी आमदार स्व. प्रदीप नाईक यांना राष्ट्रीय बंजारा परिषदेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष विलासभाऊ राठोड यांनी मुंबई येथे होणाऱ्या अधीवेशना संदर्भात मार्गदर्शन केले. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या, जिल्ह्यातील सर्व आर.बी.पी च्या पदाधिकाऱ्यांनी या सहविचार सभेला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. हिरासिंग भाऊ, जयकिसनभाऊ , प्रा. वसंत भाऊ राठोड यांनी मोलाचे मार्गदर्शन करून नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचलन जिल्हा कार्याध्यक्ष रमेश पवार यांनी केले.





Social Plugin