संदिप गावडे @ शहर प्रतिनिधी
स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दि. २३ जानेवारी २५ रोजी येथील जाणता राजा प्रतिष्ठान व आष्टा शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील जाणता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वाळवा तालुकाप्रमुख पोपट भानुसे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध उपक्रम राबवित असतात. त्यानुसार यावेळी त्यांनी गुरुवार दि. २३ जानेवारी २५ रोजी सकाळी ९ ते ५ यावेळत शिवसेना कार्यालय येथे रक्तदान शिबिराच्या आयोजन केले आहे. गरजू लोकांना रक्ताचा पुरवठा व्हायला पाहिजे, यासाठी या रक्तदान शिबिरातून जास्तीत जास्त रक्त संकलन करण्याचा त्यांचा मानस आहे.
त्यामुळे जाणता राजा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, आष्टा शहर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक तसेच आष्टा शहर व परिसरातील रक्तदात्या युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.





Social Plugin